विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 17/10/2026 :

आज नवरात्रीची सातवी माळ! आपल्या प्रत्येकाच्या घरी आणि मंदिरात देवीचे घट बसले आहेत. घटाच्या भोवती पेरलेले धान्य आता चांगले उगवले असेल. दररोज आपण घटाला माळा घालतो आणि देवीला फुले वाहतो.

घटाभोवतीचे धान्य जितके दाट आणि जोमाने उगवेल, तेवढी या वर्षी शेतीत पिके छान येतील अशी आपली लोकमान्यता आहे. त्यामुळे ते उगवलेले धान्य पाहून आपणही समाधानी असतो. दसरा झाला की हे धान्य, फुलांच्या माळा आणि हार आपण विसर्जित करतो.

मुलांनो, पूर्वी हे सर्व वाहत्या पाण्यात विसर्जित केले जायचे. पण सद्यस्थितीत नद्यांचे पाणी फारसे वाहत नाही. त्यामुळे साठलेल्या आणि आधीच प्रदूषित झालेल्या पाण्यात पुन्हा हे सर्व निर्माल्य विसर्जित करून आपण जलप्रदूषण आणखी वाढवायचे का?

आपण हे सर्व निर्माल्य शेतात, झाडांच्या बुंध्यापाशी किंवा कुंडीत विसर्जित करूया; भाविकांच्या भावनाही जपूया आणि जलप्रदूषणही टाळूया.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या