उद्योजक विठ्ठल रामचंद्र बागल यांचे अकस्मात निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/10/2026 : येथील ज्येष्ठ उद्योजक विठ्ठल रामचंद्र बागल (वय 70 वर्षे) यांचे आज बुधवार दिनांक 14/10/2026 रोजी सकाळी 7:40 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकस्मात निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
आज सायंकाळी लिंगायत कैलासभूमी अकलूज येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
कै.विठ्ठल रामचंद्र बागल यांचे अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या