नवरात्रीच्या उपवासादरम्यान तुमचीही शुगर वाढते? ३ चुका टाळा- शुगर वाढून त्रास होणार नाही

 🩺 हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र |🩺

नवरात्रीच्या उपवासादरम्यान तुमचीही शुगर वाढते? ३ चुका टाळा- शुगर वाढून त्रास होणार नाही 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/10/2026 :

नवरात्रीदरम्यान काही जणांना नऊ दिवस उपवास असतो. त्यामुळे सलग उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात.

यामुळे काही जणांना शुगर वाढल्याचाही त्रास होतो. हा त्रास टाळायचा असेल तर नवरात्रीच्या उपवासादरम्यान काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी diabetesreversaldoctor या पेजवर शेअर केला आहे.

यामध्ये त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे उपवासादरम्यान कित्येक लोक फळं खाण्यावर भर देतात. पण हे टाळायला हवं. कारण फळं आरोग्यासाठी चांगली असली तरी दिवसातून २ ते ३ वेळा फक्त फळं खाणं शुगर वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं.

उपवासाच्या दरम्यान कित्येक जण बटाटा, साबुदाणा, राजगिरा, शेंगदाण्याचा कूट असे पदार्थ खाण्यावर भर देतात. हे सगळे पदार्थ रक्तातील साखर वाढविणारे आहेत.

याशिवाय उपवास असेल तर कित्येक जणांचा दूध पिण्याकडे भर असतो. दिवसातून एक ते दोन वेळा मोठा ग्लास भरून दूध प्यायले जाते. एरवी एवढे दूध पिण्याची सवय नसेल तर त्याचा त्रास होतो. पचन बिघडते. अपचनाचे त्रास सुरू होतात. शिवाय दुधातील काही घट रक्तातील साखरही वाढवितात. त्यामुळे उपवासाच्या काळात खूप दूध पिणेही टाळावे.

♻️                             ♻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या