🍀 रानभाजी - कोरला 🍀


🍀  रानभाजी - कोरला  🍀

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/10/2026 :

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कोरला (कोरळ, कोल्हेरी, फांग) नावाच्या लहानशा झाडाला पालवी फुटते. ही कोवळी पानं आपट्याच्या पानांसारखी पाने असलेली भाजी म्हणजे कोरलाची भाजी. हि पाने पालेभाजी म्हणून खाल्ली जातात. हि भाजी अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट लागते. 

*पाककृती*

# साहित्य- भाजीच्या कोवळ्या पानांचे ३ वाटे. कडक देठ असतील तर काढून टाका. फक्त कोवळी पान व कोवळे देठ खुडून घ्या. ५-6 हिरव्या मिर्चीचे तुकडे, ५ मध्यम  आकाराचे बारीक चिरलेले कांदे, अर्धा कप मटकीची डाळ, ४-५ चमचे तेल, चवीपुरतं मीठ

# कृती- मध्यम आचेवर भांड ठेवा, ते तापले की त्यात तेल घाला. आता त्या तेलात मिरची घालून परता, नंतर त्यात कांदा घालून थोडा गुलाबी होई पर्यंतर परता. आता त्यात भाजीची पानं टाका, हवी असल्यास पानं चिरूनही घालू शकता. पानं परतून झाली की त्यात मटकीची डाळ घाला आणि त्यात मीठ घालून परता आणि झाकण ठेवा. २ ते ३ मिनिट तशीच ती भाजी  वाफेवर शिजवून घ्या. तयार भाजी भाकरी सोबत किंवा पोळी सोबत खा.

Shilpa Gadahire

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या