विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/10/2026 :
सध्या सर्वत्र 'पाणीकपाती'बाबत चिंतेची चर्चा सुरू आहे. दररोज ठराविक वेळेत नळाला येणारे पाणी आता एक दिवसाआड किंवा दोन दिवसांआड येऊ लागले आहे. काही ठिकाणी तर चक्क आठ दिवसांनी पाणी येते.
अशा वेळी पाण्याचा वापर खूप जपून केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी नळाला पाणी नाही आले, तरी ओढा, नदी, विहीर असे काहीतरी नैसर्गिक पाण्याचे स्रोत असतात. पण जिथे असे कोणतेही स्रोत नाहीत आणि नळालाही पाणी नाही, तिथे लोकांनी काय करायचे?
मुलांनो, पाणी ही एक अत्यंत जीवनावश्यक बाब आहे. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाणी हवेच! माणसांना स्वच्छतेसाठीही पाणी लागते; शिवाय शेती आणि कारखाने यांनाही पाण्याची प्रचंड गरज असते. पृथ्वीवर पाऊस पडला तरच पाणी मिळते आणि यंदा नेमका पाऊसच पुरेसा पडला नाही! मग आता काय करायचे?
उपलब्ध पाण्याचा मर्यादित साठा पुढील पाऊस पडेपर्यंत आपल्याला फार जपून वापरायचा आहे. तो कसा वापरायचा, ते आपण उद्या पाहू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या