देवी

 देवी

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 21/10/2026 :

खरतरं नवरात्रातच फक्त देवीलाच मखरात बसवायचे असे नव्हे तर देवीरुपात आपल्या अवतीभवती असणाऱ्या महिलांनाही तेवढाच सन्मान प्रदान करणे हे जास्त संयुक्तिक.            

     अर्थातच महिलांचा आदर करणारे असतात त्याचप्रमाणे महिलांना कस्पटासमान समजणारे लोकही असतात. काही महिलांना न्याय देणारे असतात तर काही फक्त महिलांवर अन्याय करायलाच जणू जन्म घेतात. काही जणं महिलांवर कौतुकाची बरसात करतात तर काही जणं फक्त महिलांच्या पायाखाली निखारेच फुलवितात. शेवटी काय तर हो उडदामाजी काळेगोरे हे असणारच.      

   नुसता नवरात्र म्हणून महिलांचा उदोउदो करायचा की संपूर्ण आयुष्य महिलांकडे देवीच्याच आदरयुक्त नजरेनं बघायचं ह्याचं प्रत्येकाचं समीकरणचं वेगवेगळं असतं बघा.

  मी मागे केलेल्या रचनेने आजच्या पोस्ट ची सांगता करते.ती रचना खालीलप्रमाणे.

    *फक्त नवरात्र आले की मगच मानसिकता बदलायची,

      सवय आहे ही माणसा तुझी फार जुनी *

   *देवी समजून नऊ दिवस पुजायचे आणि मग वर्षभर तिला गृहीत धरून चालायचे*

   *त्यापेक्षा नको मानूस तिला देवी,नको बसवूस मखरात*

   *अरे ती फक्त आधी माणूस आहे हे ठेव आधी ध्यानात*

   *एकदा का तिला देवीत्व बहाल केलंस की 

    तुझं मात्र सगळं पुढील खूप सोप्पं झालं*

   * देवीत्वाच्या ओझ्याखाली बिचारीचे मनोगत

   मौनव्रताने अलगद मूक झालं *

   * बनविलीस तिला मूर्ती त्यागाची, तुझी झोळी मात्र कायम ठेवलीस भरलेली *

   *त्याग,समर्पण करता करता ही मात्र रिक्त होऊन स्वतः थकलेली.*

*म्हणून माणसा देवीत्व बहाल करायच्या ऐवजी आधी तिला माणूस म्हणून जाणायला शीक*

  *समजून उमजून तिला घेतलसं तर स्त्री च्या

    अस्तित्वाचे संतुलन होईल नीट,

         अस्तित्वाचे संतुलन होईल नीट.

कल्याणी बापट (केळकर)                           9604947256

बडनेरा, अमरावती                           21/10/2026

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या