🍀 रानभाजी - कोंबडा 🍀

 

🍀  रानभाजी - कोंबडा  🍀

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/10/2026 :

सध्या रान रंगीबेरंगी फुलांनी बहरलय, त्यातच फुललाय हा कोंबडा. भरपूर लोह आणि खनिजांचे प्रमाण असलेल्या या भाजीत जीवनसत्व अ, क आणि इ यांचे चांगले प्रमाण असते. फुलावर आल्यावर कॅल्सिअम आणि पोट्याशिअम भरपूर मिळते. यात असणारे बी-कॅरोटीन हे महत्वपूर्ण पोषकद्रव्ये रोगप्रतीकारकता वाढवण्यास मदत करते. या वनस्पतीचा उपयोग कफ, मधुमेह, डायरिया, जुलाब, डोळ्यांचे विकार, स्त्रियांच्या पाळीच्या समस्या, हात-पाय दुखणे, गोनोरिया याच्या इलाजासाठी केला जातो. सर्पदंशसाठीही सुद्धा उपयोगी औषध आहे. फुलवलेल्या भाजीची चव पानांच्या भाजी पेक्षा जास्त छान लागते.

पाककृती

कोंबड्याचे फुले आलेल्या कोवळ्या फांद्या कोवळ्या पानांसह खुडून घ्यायच्या. बारीक कापून, धुवून, गरम पाण्यात अर्धवट उकडवू घ्यायची. नंतर पिळून कांदा, मिरचीची तेलात फोडणी करून तव्यावर परतवावी. 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या