मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/10/2026 :
आपण सर्व जण (काही अपवाद वगळता) आयुष्यभर श्रीमंत होण्यासाठी व आनंद मिळवण्यासाठी धडपड करत असतो. वास्तविक पाहता, श्रीमंती आणि आनंद यांचा थेट काहीच संबंध नसतो.
लोक श्रीमंत आहेत म्हणजे केवळ पैशाने! 'ज्याच्याकडे भरपूर संपत्ती, तो श्रीमंत' ही आपली सर्वसामान्य व्याख्या आहे. पण अशी व्यक्ती जर एकाकी असेल किंवा सतत आजारी असेल, तर ती खऱ्या अर्थाने आनंदी असू शकेल का?
मुळात आपले आरोग्य चांगले हवे. आपण निरोगी आहोत, निसर्गाचा मुक्त आनंद घेतोय, कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या पायावर चालतोय-फिरतोय आणि साधी भाजी-भाकरी खाल्ली तरी ती अंगाला लागतेय; तसेच आपण सकारात्मक विचार करतोय, हीच आपली खरी श्रीमंती होय! आनंदी राहण्यासाठी आणि जगण्यासाठी खरोखर खूप कमी पैसे लागतात.
आजचा संकल्प
केवळ पैसे कमावण्यात आयुष्य निघून जाते आणि जीवनाचा खरा आनंद घेता येत नाही, हे वेळीच लक्षात घेऊन छोट्या-छोट्या गोष्टींतून निखळ आनंद लुटू आणि जीवन सार्थकी लावू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या