मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/10/2026 :

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवरात्रोत्सवातील दसरा हा खऱ्या अर्थाने विजयाचा दिवस! महिषासुराशी सलग नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी देवीमाता विजयी झाली, तो हा मंगल दिवस. अश्विन शुद्ध दशमी अर्थातच विजयादशमी!

आजच्या घडीला आपल्या प्रत्येकाला राक्षसरूपी अनेक समस्यांना दररोज सामोरे जावे लागते. अनेक अडचणींचा हिमतीने सामना करावा लागतो, लढावे लागते. सद्यस्थितीत आपल्याकडे 'प्रदूषणाची' समस्या फार मोठी आणि भयंकर आहे.

सर्वप्रथम आपण 'वैचारिक प्रदूषणाचा' सामना करण्याचा ठाम निश्चय करूया. ते वैचारिक प्रदूषण दूर झाले, की इतर सर्व प्रदूषणे आपोआप कमी होतील. समाजातील प्रत्येक समस्येच्या निराकरणाकडे जर सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले, ती समस्या मुळापासून नष्ट करण्याच्या दृष्टीने विचार केला आणि नंतर प्रत्यक्ष कृती केली, तर या प्रदूषणाच्या राक्षसाचा नक्कीच संहार होईल.

आजचा संकल्प

आपण सर्व जण सभोवतालच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध राहू. आपल्या परीने आपण प्रत्येक जण प्रामाणिक प्रयत्न करू आणि आपले वातावरण प्रदूषणमुक्त करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या