🟦 "विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणासोबत सामाजिक समस्यांचा अभ्यास करावा" : कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील 🟢 सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

 


🟦 "विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणासोबत सामाजिक समस्यांचा अभ्यास करावा" : कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील

🟢 सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/9/2026 :

 "विद्यार्थ्यांनी बदलत्या जगाला आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. समाजासमोरील विविध समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. ज्ञान, कौशल्य आणि सामाजिक जाणीव यांच्या समन्वयातून देशाची तसेच स्वतःची प्रगती साधता येईल." असे विचार महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

 शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट संचलित सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज येथे डिप्लोमा (पदविका) व डिग्री (पदवी)अभियांत्रिकीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मंगळवारी (दि. २९) सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सांस्कृतिक भवन, शंकरनगर-अकलूज येथे उत्साहात संपन्न झाला. तेव्हा त्या व्यासपीठावरून बोलत होत्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील  व श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. 

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह शंकरराव मोहिते- पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, महाविद्यालयाच्या ट्रस्टचे सचिव सुहास रघुनाथ यादव, महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य व हॉस्टेल समितीचे सदस्य, समन्वयक, पत्रकार, पालक, विद्यार्थी, व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, विविध अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच शिस्तीला दिले जाणारे महत्त्व याबाबत त्यांनी माहिती दिली.

व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विविध विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकांसमवेत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांच्या  शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले.   या मधील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे:

पदवी (DBATU विद्यापीठ परीक्षा) प्रथम वर्ष विभाग- पिसे अनुजा बाळासो (CGPA-9.07)- प्रथम क्रमांक, पालवे तृप्ती छगन (CGPA-8.83)-द्वितीय क्रमांक,  जाधव गौरी राहुल (CGPA-8.77)- तृतीय क्रमांक, द्वितीय वर्ष – संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग – अमानत इन्नुस शेख(SGPA--8.10)- प्रथम क्रमांक, सानिका अश्विन सावंत (SGPA-8.02)- द्वितीय क्रमांक, जाधव गौरी राहुल (SGPA-8.77)- तृतीय क्रमांक, तृतीय वर्ष– संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग- कोमल राजेंद्र सालगुडे पाटील (SGPA—8.63)- प्रथम क्रमांक, गौरी मुरलीधर गायकवाड (SGPA-8.61)- द्वितीय क्रमांक, नानावरे पल्लवी गोरख (SGPA-8.46)- तृतीय क्रमांक, अंतिम वर्ष – संगणक विज्ञान व अभियांत्रिकी- साक्षी वसंत कुंभार (SGPA-8.58), तेजश्री धनंजय भोंग(SGPA-8.58)-, प्रेरणा संदीप पवार(SGPA-8.58)- प्रथम क्रमांक, प्रेरणा दिलीप बोराटे (SGPA-8.46)-  द्वितीय क्रमांक, वर्षाराणी एकनाथ बुधनावर(SGPA-8.42), प्रणाली अजिनाथ जाधव(SGPA-8.42), निकिता विजय जाधव(SGPA-8.42)- तृतीय क्रमांक, द्वितीय वर्ष – कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स अभियांत्रिकी- विद्या अनिल सरडे(SGPA-8.29)- प्रथम क्रमांक, साई शीतलकुमार चव्हाण(SGPA-8.29)- द्वितीय क्रमांक, पूर्वा अजय आव्हाड(SGPA-7.88)- तृतीय क्रमांक, द्वितीय वर्ष – इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी- दुधाळ सानिका तायाप्पा(SGPA-8.13)- प्रथम क्रमांक, दुधाळ संजीवनी आगत्राव (SGPA-7.96)- द्वितीय क्रमांक, शिंदे हर्षदा नागनाथ(SGPA-7.77)- तृतीय क्रमांक, द्वितीय वर्ष – विद्युत अभियांत्रिकी- बागल प्रतीक्षा राजेंद्र(SGPA-8.57)- प्रथम क्रमांक, देशमुख सुजाता गुलाब(SGPA-8.09)- द्वितीय क्रमांक, विरकर शिवानी सुनील व गडदे अश्विनी शिवाजी (SGPA-7.85)- तृतीय क्रमांक, तृतीय वर्ष – विद्युत अभियांत्रिकी- गडदे अश्विनी शिवाजी(SGPA-7.85)- प्रथम क्रमांक, अंतिम वर्ष – विद्युत अभियांत्रिकी- इंगोले गौरी दत्तात्रय(SGPA-8.36)- प्रथम क्रमांक, यादव पृथ्वीराज पांडुरंग- द्वितीय क्रमांक, शेख शाहीद इसाक (SGPA-7.55)- तृतीय क्रमांक, अंतिम वर्ष – विद्युत अभियांत्रिकी- प्रकाश सगई(SGPA-8.41)- प्रथम क्रमांक, रोहित दीपक शिंदे(SGPA-8.41)-द्वितीय क्रमांक, सुतार ओंकार रमेश(CGPA-7.94)- तृतीय क्रमांक ,स्थापत्य अभियांत्रिकी- सपकाळ तनिष्का विठ्ठल(SGPA-7.21)- प्रथम क्रमांक, वाडिकर शुभम शामराव(SGPA-7.21)- द्वितीय क्रमांक, बचुटे नंदिता अरुण(SGPA-7.05)- तृतीय क्रमांक, तृतीय वर्ष – स्थापत्य अभियांत्रिकी-सकट ऋतुजा संतोष(SGPA-7.07)- प्रथम क्रमांक, पिंगळे राहुल वसंत(SGPA-6.83)- द्वितीय क्रमांक, राऊत प्रशांत सतीश(SGPA-6.71)- तृतीय क्रमांक, अंतिम वर्ष – स्थापत्य अभियांत्रिकी- बारवे साहिल शंकर-(SGPA-9.17)- प्रथम क्रमांक, खान अनिस सलीम(SGPA-8.75)- द्वितीय क्रमांक, शुभम शाहाजी शिंदे, वाघरेदिपाली अनिल, वळकुंडे शुभम भिवा(SGPA-8.42)- तृतीय क्रमांक, द्वितीय वर्ष – यांत्रिक अभियांत्रिकी- चव्हाण साक्षी किसान(SGPA-7.71)- प्रथम क्रमांक, निंबाळकर संभाजीराजे शशिकांत(SGPA-7.29)- द्वितीय क्रमांक, निकम जोतिराम दत्तात्रय(SGPA-7.24)- तृतीय क्रमांक, तृतीय वर्ष – यांत्रिक अभियांत्रिकी- प्रियदर्शनी नवनाथ वसव(SGPA-7.86)- प्रथम क्रमांक, काळे शुभांगी तानाजी(SGPA-7.72)- द्वितीय क्रमांक, वाघमारे आकांक्षा कृष्णकांत(SGPA-7.67)- तृतीय क्रमांक, अंतिम वर्ष – यांत्रिक अभियांत्रिकी- कांसे ऐश्वर्या मारुती(SGPA-8.04)- प्रथम क्रमांक, देवकुळे ज्ञानदेव नंदकुमार(SGPA-8.01), माने देशमुख रुद्रतेज अमरसिंह(SGPA-7.74) तसेच डिप्लोमा(MSBTE) उन्हाळी २०२६ परीक्षा गुणवंत विद्यार्थी पुढिल प्रमाणे होते प्रथम वर्ष विभाग- कोतमिरे सृष्टी जयकुमार(92.94%)- प्रथम क्रमांक, कोतमिरे क्षिती जयकुमार(91.18%)- द्वितीय क्रमांक, कदम शर्वरी दीपक(89.18%)- तृतीय क्रमांक, द्वितीय वर्ष – संगणक विज्ञान व अभियांत्रिकी- शेख महेविश शब्बीर(90%)- प्रथम क्रमांक, जाधव पायल प्रविण(89.65%)- द्वितीय क्रमांक, तलवार आप्पासाहेब शिवाजी(86.24%)- तृतीय क्रमांक, तृतीय वर्ष – संगणक विज्ञान व अभियांत्रिकी- पेटकर श्रद्धा शाहाजी(93.65%)- प्रथम क्रमांक, माने देशमुख स्वरांजली अभयसिंह(93.41%)- द्वितीय क्रमांक, पवार वैष्णवी बापू(93.24%)- तृतीय क्रमांक, द्वितीय वर्ष – विद्युत अभियांत्रिकी-कविटके शिवम राजकुमार (80.71%)- प्रथम क्रमांक, जगताप गौरी संतोष (79.88%)- द्वितीय क्रमांक, फुले रंजीत विजय (72.58%)- तृतीय क्रमांक, तृतीय वर्ष – विद्युत अभियांत्रिकी- आदित्य राजकुमार सालगुडे-पाटील (91.71%)- प्रथम क्रमांक, भोराडे वैष्णव नवनाथ (90.12%)- द्वितीय क्रमांक, धिरज चंद्रकांत पिसे (86%)- तृतीय क्रमांक, द्वितीय वर्ष – यांत्रिक अभियांत्रिकी- निकम वेदांत अशोक (84.11%)- प्रथम क्रमांक, गुलमकर शुभम लक्ष्मण (83.22%) व शेख रेहान जाकीर (83.22%)- द्वितीय क्रमांक, वाघ रितेश व्यंकटेश (77.33%)- तृतीय क्रमांक, तृतीय वर्ष – यांत्रिक अभियांत्रिकी- फुले गोविंद सदाशिव (82.42%)- तृतीय क्रमांक, शाहिद रमजान मुलाणी (80.53%)- द्वितीय क्रमांक, क्षीरसागर संभाजीराजे रविकांत (79.26%)- तृतीय क्रमांक, द्वितीय वर्ष – स्थापत्य अभियांत्रिकी- भोसले सृष्टी सतीशकुमार (78.92%)- प्रथम क्रमांक, विरकर धिरज सुनील (78.26%)- द्वितीय क्रमांक, करगळ सोनाली बाळकृष्ण (65.33%)- तृतीय क्रमांक, तृतीय वर्ष – स्थापत्य अभियांत्रिकी- भिंगारदिवे जयराज किशोर (79.56%)- प्रथम क्रमांक, माने-देशमुख स्वरांजली भरत (78.50%)- द्वितीय क्रमांक, साठे श्रावणी दत्तात्रय (77.78%)- तृतीय क्रमांक. त्याचबरोबर द्वितीय वर्ष पदवी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी शिवतेज विक्रमसिंह माने-देशमुख याने कॉपीराइट कार्य यामध्ये पेटंट मिळवले आहे तसेच डिप्लोमा (MSBTE परीक्षा) यामध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा मधील कोतमिरे क्षिती जयकुमार (91.18) व कोतमिरे सृष्टी जयकुमार (92.94) या विद्यार्थिनीनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. त्याचबरोबर अंतिम वर्ष – विद्युत अभियांत्रिकी पदवी विभागातील विद्यार्थी साकेत जगदीश गायकवाड हा GATE 2026 ही परीक्षा उत्तीर्ण आहे.

      महाविद्यालयामधील काही विद्यार्थिनींनी १०० पैकी १०० गुण मिळवून एम.एस.बी.टी.इ. मध्ये आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. महाविद्यालयांमध्ये जवळपास १७९२ विद्यार्थी शिक्षण घेत असून  काही विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. आता सध्या जगाला स्किल मॅन पावर अपेक्षित असून प्रॅक्टिकल ओरिएंटेशन वरती भर देण्यासाठी सर्व संचालक मंडळ व महाविद्यालयाचे आध्यक्ष  जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी यावर्षीपासून महिन्याभरात कॅम्पस क्रेडिशन या कंपनीसोबत करार करून दोन वर्षाचा कोर्स विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंट साठी व प्लेसमेंट साठी उपयोगी ठरणारा असून यातील निम्माखर्च महाविद्यालय उचलणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होणार आहे. आपल्या महाविद्यालयात आतापर्यंत ४०० विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले असून आणखी विद्यार्थ्यांचे कसे प्लेसमेंट होईल यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

अकलूज व परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयात ‘सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील वाचनालय’ सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या वाचनालयाचे उद्घाटन दि. १५ ऑक्टोबर रोजी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांनी त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गुणवंत विद्यार्थ्यांपैकी गौरी जाधव व शिवतेज माने-देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, शिक्षकांचे मार्गदर्शन व मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकिता फडे व प्रा. सौरभ काटे यांनी केले. डिप्लोमा विभागाचे विभागप्रमुख प्रा. संजय झंजे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अनिल कोकरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

‘सारे जहाँ से अच्छा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या