महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेच्या खेळाडूंची तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/10/2026 :
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेच्या क्रीडा यशात मानाचा तुरा रोवला. अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रशालेच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट प्रदर्शन केले.
स्पर्धेतील १४ वर्षांखालील वयोगटात ४ × १०० मीटर रिले स्पर्धेत प्रांजल अण्णासाहेब सूर्यवंशी, वैष्णवी गणेश कांबळे, काजल रामप्रसाद चौहान, आरोही शंकर पांडगळेआणि वीरा पुंडलिक भोसले यांनी द्वितीय क्रमांक पटकावत प्रशालेचा गौरव वाढवला. तसेच गौरव ऋषिकेश चव्हाण याने गोळाफेक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून क्रीडा क्षेत्रातील आपली गुणवत्ता सिद्ध केली.
17 वर्षे वयोगटामध्ये आदिती महादेव काळे, शंभूराजे बाबासो बोरकर, अवधूत श्रीकांत जाधव, यश अनंत जानकर, प्रथमेश लखन वायदंडे, सुरज राजकुमार लोहकरे, प्रतीक पांडुरंग काळे, हर्ष अमित डहाळे,शिवप्रसाद गणेश वाटकर,श्रीनाथ प्रशांत माने या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्रीडा प्रकारात क्रमांक पटकावला.
19 वर्षे वयोगटांमध्ये वैभवी उमेश ठोंबरे, जानवी खांडवे, अनुष्का शिंदे ,गिरीजा पालकर, इशा साठे, अवनी नवगिरे, आकाशी गौड ,अंकिता साठे यांनी क्रमांक पटकावले .
पुणे येथे झालेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रशालीतील 19 वर्षे वयोगटांमध्ये 87 किलो वजन गटांमध्ये ओंकार नवसुपे याने विभागामध्ये प्रथम व अमरावती येथे होणारे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीमागे त्यांची मेहनत, नियमित सराव, जिद्द आणि क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करावी, यासाठी प्रशालेत सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. या सर्व खेळाडूंचा सन्मान समारंभ व्यासपीठावर प्रशालेच्या वतीने पार पडला. तसेच क्रीडा मार्गदर्शक प्रदीप पांढरे व दादाभाई सय्यद यांचाही सन्मान व्यासपीठावर संपन्न झाला.
या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील ,सचिव अभिजीत रणवरे ,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर, क्रीडा शिक्षक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर मैदानावर मिळवलेले यश हेच उज्ज्वल भविष्याचे पहिले पाऊल आहे या यशस्वी कामगिरीमुळे महर्षि प्रशालेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

0 टिप्पण्या