■ भारतातील सर्वात प्राचीन वटवृक्ष कुठे आहे?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/10/2026 :
*नैनिताल* : उत्तराखंड मधील नैनिताल जवळ सुमारे २०० वर्षे जुने वडाचे झाड आहे. कोणत्याही हिल स्टेशन मध्ये इतके जुने वडाचे झाड सापडणे दुर्मिळ आहे. नैनिताल मध्ये भेट देण्यासाठी येणारी लोक जेव्हा या वटवृक्षाला पाहतात, तेव्हा याची भव्यता, मजबुती आणि लांब पारंब्या पाहून थक्क होता. यावरूनच झाडाचे महत्त्व स्पष्ट होते.
*गुजरात* : गुजरात मधील आणंद जिल्ह्यात वड तालुका नावाचं वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचे वय सुमारे ३०० वर्षे आहे. हे झाड इतके प्राचीन असल्याने, स्थानिक समुदायासाठी एक आध्यात्मिक केंद्र मानले जाते.
*प्रयागराज* : उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे संगम नदीच्या काठावर एक प्राचीन वटवृक्ष आहे. येथील वडाच्या झाडाला अक्षयवट म्हटले जाते. हे झाड इथे अनादी काळापासून वसले आहे.
*पश्चिम बंगाल* : पश्चिम बंगाल मधील आचार्य जगदीन चंद्र बोस बोटॅनिकल गार्डन मध्ये द ग्रेट वटवृक्ष आहे. हे वटवृक्ष सुमारे २५० वर्षे जुने आहे. हे झाड त्याच्या पसरलेल्या मुळांमुळे जंगलासारखे दिसते. हे वडाचे झाड सुमारे ३.५ एकर जमिनीवर पसरलेले आहे. याच्या पारंब्या इतक्या पसरलेल्या आहेत की त्याच्या आत रस्ते आणि रस्त्याचे जाळे आहेत.
*आंध्र प्रदेश* : आंध्र प्रदेश राज्यातही एक प्राचीन थिमम्मा मरिमानु नावाचे वडाचे झाड आहे. हे झाड अनंतपूर जिल्ह्यातील गुटी मंडळात आहे. या झाडाचे वय ५५० वर्षांपेक्षा जास्त आहे. हे झाड जगातील सर्वात मोठ्या वडाच्या झाडांपैकी एक आहे. हे झाड ५ एकर जमिनीवर पसरलेले आहे. हे झाड जिथे उगवले तिथे थिम्मा नावाच्या महिलेने सती जाऊन आपला जीव दिला होता.
*गया* : बिहारच्या गया मध्ये एक प्राचीन, वटवृक्ष आहे, ज्याला अक्षयवत म्हणतात. गया-बोधगया रस्त्यावर वसलेल्या मौनपूर वळणापासून हे अक्षयवत अर्धा किमी अंतरावर आहे.
*पंचवटी* : पंचवटी म्हणजे ज्या ठिकाणी पीपळ, बेल, वट, हरड आणि अशोक ही पाच झाडे लावली जातात. जगदलपूर पासून ६२ किमी अंतरावर छत्तीसगड च्या दंडकारण्य प्रदेशात एक पंचवटी आहे. येथे असलेले वटवृक्ष खूप प्राचीन आणि प्रसिद्ध आहे.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
═━═━═━═━═━═━═━═

0 टिप्पण्या