शाळा प्रवेशासाठी वयाचा एकसमान फॉर्म्युला! नर्सरीसाठी ३ तर पहिलीसाठी ६ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक; शासनाचा मोठा निर्णय

 शाळा प्रवेशासाठी वयाचा एकसमान फॉर्म्युला! नर्सरीसाठी ३ तर पहिलीसाठी ६ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक; शासनाचा मोठा निर्णय

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/10/2026 :

राज्यातील पूर्वप्राथमिक आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेत वयाबाबत एकसमान निकष लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिली यांसाठी मुलांचे किमान वय निश्चित करण्यात आले असून, शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून या नियमांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे.

नव्या नियमानुसार नर्सरीमध्ये प्रवेशासाठी तीन वर्षे, ज्युनिअर केजीसाठी चार वर्षे, सिनिअर केजीसाठी पाच वर्षे, तर इयत्ता पहिलीसाठी

पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट

मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील उच्च वर्गात प्रवेश देताना नव्या वयोमर्यादेचे निकष लागू करण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आधीच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ वयाच्या निकषामुळे त्याच वर्गात थांबवले जाणार नाही.

चार टप्प्यांत बदल : शासनाच्या निर्णयानुसार नव्या वयोमर्यादेची अंमलबजावणी एकाच वेळी न करता चार शैक्षणिक वर्षांत टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. त्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षणापासून इयत्ता पहिलीपर्यंत प्रवेशाच्या वयाची साखळी निश्चित होईल. नव्या व्यवस्थेनुसार, २०२७-२८ मध्ये नर्सरीमध्ये तीन वर्षे पूर्ण झालेल्या वयात प्रवेश घेणारे विद्यार्थी पुढील वर्गांमधून क्रमाने पुढे जात २०३०-३१ मध्ये सहा वर्षे पूर्ण झालेल्या वयात पहिलीत प्रवेश घेऊ शकतील.

नर्सरी ३, ज्युनिअर केजी ४ तर सिनिअर केजीसाठी ५ वर्षे वयाचा निकष

अ. क्र.     प्रवेशाचा वर्ग इयत्ता पहिली पूर्वीचा क्रम     किमान वय     अंमलबजावणीचे शैक्षणिक वर्ष

१  बालवाटिका–१ / नर्सरी    तिसरा वर्ग      ३ वर्षे   २०२७–२८ पासून

२  बालवाटिका–२ / ज्युनिअर के.जी.   दुसरा वर्ग      ४ वर्षे   २०२८–२९ पासून

३  बालवाटिका–३ / सिनिअर के.जी.   पहिला वर्ग      ५ वर्षे   २०२९–३० पासून

४  इयत्ता पहिली    —      ६ वर्षे   २०३०–३१ पासून

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या