विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/10/2026 :
सध्या नवरात्र सुरू आहे; आज देवीची सहावी माळ! देवीची आरती करताना त्या जोडीला इतर देवांच्या ज्या आरत्या म्हणतात, त्या पण पाठ करा. मंत्रपुष्पांजली पाठ करा, ती म्हणताना खूप छान वाटते. आपलेच आपल्याला मन प्रसन्न वाटते.
आरती झाल्यावर आरतीचे ताट फिरवणे, भाविकांना फुले आणि प्रसाद वाटप करणे अशी छोटी-छोटी कामे दिली, तरी ती जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करायची. मनोभावे सेवा केल्याने त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो.
मुलांनो, आपले सण-उत्सव आपल्याला बरेच काही शिकवतात. सार्वजनिक कार्यात कामाची विभागणी कशी करावी, गोड बोलून इतरांकडून काम कसे करून घ्यावे आणि छान काम करणाऱ्याला शाबासकी देऊन कसे प्रोत्साहित करावे, हे सर्व कौशल्य यातून शिकता येते.
आपल्या सोबत असलेल्या लहान-मोठ्यांचे निरीक्षण करा आणि त्यातून कायम चांगले काहीतरी शिकत राहा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या