मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/10/2026 :
आपण प्रत्येक जण सौंदर्यपूजक असतो. कोणतीही गोष्ट जी सुंदर आहे, ती आपल्याला चटकन आवडते. काही खरेदी करताना बारकाईने निरीक्षण करून जी वस्तू छान वाटते, तीच आपण घेतो.
सगळीच फुले छान असतात; पण त्यातल्या त्यात टवटवीत, टपोरे, सुंदर आणि सुवासिक असे फूल आपण उचलतो. माणसांचे सौंदर्य म्हणजे त्यांचा रंग, रूप, नाक, डोळे, उंची असे सर्व काही आकर्षक असावे असे आपल्याला वाटते.
पण कधी कधी नेमका उलट अनुभव येतो. गोड आवाजात गाणारा आणि आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना आपलेसे करणारा कोकीळ पक्षी रंगाने काळाकुट्ट असतो. सुंदर पिसाऱ्याने सर्वांना आकर्षित करणाऱ्या मोराचे पाय मात्र बेढब असतात. अफाट आणि तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या ज्ञानी व्यक्तीचे कोणीही बाह्य रूप पाहत नाही.
आजचा संकल्प
बाह्य रूपावरून कोणाचेही परीक्षण न करता त्यांचे गुण, बुद्धिमत्ता, त्यांच्यातील कला, देशभक्ती, नीतिमत्ता अशा कितीतरी सकारात्मक गोष्टींच्या माध्यमातून त्यांना आपलेसे करू आणि त्यांच्या खऱ्या गुणांचा सन्मान करु.

0 टिप्पण्या