सदाशिवराव माने विद्यालयाचे क्रीडा स्पर्धांत घवघवीत यश; सहा खेळाडूंची जिल्हास्तरावर, तिघांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंगसाठी निवड
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/10/2026 :
सदाशिवराव माने विद्यालयाच्या खेळाडूंनी तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. मैदानी स्पर्धेत सहा खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली, तर वेटलिफ्टिंगमध्ये तीन खेळाडूंनी विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विद्यालयाच्या १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा
शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे १० व ११ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या. तालुक्यातील विविध शाळांच्या खेळाडूंवर मात करत विद्यालयाच्या खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली. त्यापैकी सहा खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. निवड झालेले खेळाडू व त्यांची कामगिरी पुढीलप्रमाणे:
संग्राम लवटे (१९ वर्षे) – गोळाफेक व थाळीफेक – तालुक्यात प्रथम
संजय शिंदे (१९ वर्षे) – हातोडाफेक – तालुक्यात प्रथम
तेजस वाघमोडे (१९ वर्षे) – गोळाफेक व थाळीफेक – तालुक्यात द्वितीय
शंकर वायदंडे (१९ वर्षे) – भालाफेक – तालुक्यात द्वितीय
अवैस शेख (१९ वर्षे) – २०० मीटर धावणे – तालुक्यात द्वितीय
समर्थ सावंत (१७ वर्षे) – ३००० मीटर धावणे – तालुक्यात द्वितीय
आर्यन लवटे (१४ वर्षे) – थाळीफेक – तालुक्यात द्वितीय
याशिवाय विष्णू चोरमले (१७ वर्षे, ८०० मीटर धावणे), कु. अस्मिता कदम (१७ वर्षे, उंच उडी) आणि यशराज कदम (१७ वर्षे, २०० मी धावणे) यांनी तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला.
विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धा
८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथे झालेल्या विभागीय स्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धेत विद्यालयाच्या सुजल धडांबे, सार्थक काळे व विराज पोमणे या तीन खेळाडूंनी उज्ज्वल कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा
५ ऑक्टोबर २०२६ रोजी चारे (ता. बार्शी) येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत विद्यालयाच्या १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
मार्गदर्शन व सत्कार
या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक उमेश भिंगे, भीमाशंकर पाटील, भीमराव दुधाळ व संजय राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयात आयोजित कार्यक्रमात या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक अमोल फुले यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांकडून अभिनंदन
खेळाडूंच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, विद्यालयाचे सभापती सयाजीराजे मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील तसेच सर्व संचालक, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, शिक्षक प्रतिनिधी सुजित कांबळे, क्रीडाशिक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या