विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/10/2026 :
सध्या 'पाणी काटकसरीने वापरले पाहिजे' याविषयी सर्वत्र विचारविनिमय सुरू आहे. पण काटकसर करायची म्हणजे नेमके काय?
पाण्याचा अनावश्यक वापर थांबवणे : गळके नळ दुरुस्त करणे, पाण्याचे नळ विनाकारण चालू न ठेवणे, कपडे-भांडी चालू नळाखाली न धुणे, पाईपने पाणी मारून गाड्या किंवा फरशी धुणे टाळणे, घरातील शिळे पाणी उगाच फेकून न देणे आणि पिकांना वा झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी न देणे.
पाणी प्रमाणात वापरणे : पिण्यासाठी गरजेपुरतेच पाणी घेणे. केवळ एक घोट पाणी पिऊन बाकीचे फेकून देणे चुकीचे आहे. स्वच्छतेसाठीही पाणी जपून वापरणे महत्त्वाचे असते. शेतीला जर ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले, तर खूप कमी पाण्यात पिके उत्तम येतात.
पाण्याचा पुनर्वापर : स्वयंपाकघरातील वापरलेले पाणी बागेतील झाडांना किंवा कुंड्यांना घालणे; कपडे धुतलेले किंवा पिळलेले पाणी संडास-बाथरूम आणि अंगणातील फरशी धुण्यासाठी किंवा सडा घालण्यासाठी वापरणे.
मुलांनो, अशा प्रकारे आपण जितकी बुद्धी चालवून पाणी वाचवण्याचा प्रयत्न करू, तितके ते आपल्या सर्वांच्या भविष्यकाळासाठी फायद्याचे आहे!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या