🔰 प्राचीन ग्रीक शिल्पे 🔰

 

🔰 प्राचीन ग्रीक शिल्पे 🔰

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 9/10/2026 :

ग्रीक शिल्पांमध्ये आपल्याला अप्रतिम कलाकारी दिसून येते. ही शिल्पे नग्नतेमुळेही पाहणा-याचे लक्ष वेधून घेतात. ग्रीसमध्ये आपल्याला अशी अनेक शिल्पे दिसतील. ही असीरीयन संस्कृती होती आणि या संस्कृतीत नग्नावस्था ही अपमानास्पद खूण होती. त्याकाळी युध्दात पराभूत झालेल्या सैनिकांचं चित्रण नग्नावस्थेत केलं जायचं आणि विजयी सैनिकांना मात्र पूर्ण पोशाखात दाखवले जायचे. ग्रीसमध्ये पूर्वीच्या काळी जिमनॅशियम बंद खोलीत नसायचे. जिमनॅशियम या शब्दाचे मूळ 'जिमनाॅस' या शब्दात आहे ज्याचा अर्थ नग्न असा होतो. पूर्वीच्या काळी ग्रीसमध्ये पुरुष नग्नावस्थेत व्यायाम करायचे. व्यायाम करताना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खेळाडू शरीराला माती आणि ऑलिव्ह ऑइलचा लेप लावत असत. सार्वजनिक ठिकाणी खेळादरम्यान विवस्त्र होणं हे त्यांच्या संस्कृतीत अभिमानाचं मानलं जायचं. म्हणूनच ग्रीसमधील शिल्पांमध्ये खेळाडू नग्नावस्थेत पाहायला मिळतात. 

असं असलं तरी सर्वसामान्य नागरिक पूर्ण कपड्यांतच वावरायचे. ग्रीसमध्ये अफ्रोडाईट ही लैंगिक सुखाची देवता मानली जात होती. या देवतेची शिल्पे नग्नावस्थेत असायची. पूर्वीच्या काळात सिम्पोझियम साठी ग्रीक प्रजनन निर्वस्त्र होऊन व्हायचे. सिम्पोझियमचा अर्थ एकत्र बसून दारू पिणे आणि नंतर स्त्री गमन करणे असा आहे. नग्न पुरुष शरीर हे प्राचीन ग्रीक लोकांसाठी एक शक्तीशाली, सर्वव्यापी आणि बहुआयामी प्रतीक होते. प्राचीन ग्रीक संस्कृतीत पुरूषांची नग्नता सौंदर्यात्मक दृष्टीने पाहिल्या जायची. म्हणूनच ग्रीसमध्ये अनेक प्राचीन परंपरांमध्ये देव आणि नायक यांची शिल्पे आपल्याला नग्नावस्थेत दिसतात.

ग्रीसमधील लोकांकडे स्वतःचे जिम असायचे जिथे ते नग्न सराव करीत. त्यांचा मुद्दा असा होता की श्रीमंत लोक त्यांचे शरीर दाखवू शकत होते. माझ्याकडे माझ्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ आणि पैसा आहे असे दाखवणे श्रीमंतीचे लक्षण होते. यामुळे अनेक ग्रीक पुतळे, विशेषतः देवतांचे आणि खेळाडूंचे पुतळे खूप स्नायूंचे असलेले आणि कसदार शरीरयष्टी असलेले असत. पुरूषांचे शिल्प तंदुरुस्त आणि क्रीडामय दिसते. एजियन समुद्रातील नग्न पुरूषांच्या प्रतिमांचा सर्वात जुना संग्रह लहान कांस्य मूर्तींच्या स्वरूपात आहे.      

प्राचीन ग्रीक संस्कृतीत महिलांचं कर्तव्य म्हणजे निरोगी बाळाला जन्म देणे हे होते. प्राचीन ग्रीसमधील स्त्रिया त्यांच्या पतीच्या आणि मुलांच्या हिताचे काय आहे ते बघत असत. प्राचीन ग्रीक लोकांमध्ये ऍथलेटिक्स मधील स्पर्धा त्यांच्या संस्कृतीचा एक भाग होता. त्यांनीच ऑलिंपिक खेळांची सुरूवात केली. ज्या महिला त्यांच्या पतीसाठी आणि मुलांसाठी झटत त्यांना समाजात मानाचे स्थान किंवा आदरणीय समजले जायचे. ज्या महिला स्वातंत्र्य मिळविण्याचा किंवा बंधने झुगारून बंड करायच्या, अशा बंडखोर महिलांना क्रूर शिक्षा दिली जात असे. म्हणूनच ग्रीसमधील पुतळे पुरूषांना त्यांच्या उच्च पदावर दाखवण्यासाठी असत.

म्हणजे पुरूषत्वाचे स्मरण करण्यासाठी प्राचीन ग्रीक लोकांचा विचार पुतळ्यांमध्ये दिसतो. नग्न पुतळ्यांद्वारे खेळाडूंना माॅडेल म्हणून दाखवले जात असे. हे पुतळे आदर्श शरीराचे प्रतिनिधित्व करीत असत. ग्रीसमधील नागरिक पूर्ण कपड्यांतच वावरायचे, अपवाद होता एका उत्सवाचा. तो उत्सव म्हणजे अथेना. या उत्सवात अथेना नावाच्या देवतेच्या स्मरणार्थ अथेन्स ते पार्थनेत या रस्त्यावर वर्षातून एकदा सर्व पुरूष मिरवणुकीत नग्नावस्थेत धावत जायचे. आपण डिस्कोबोलस या थाळीफेक करणा-या खेळाडूच्या शिल्पाकडे बघितले तर त्याचे पिळदार शरीर दिसून येते. शिल्प नग्नावस्थेत असले तरी या शिल्पाकडे पाहिल्यावर शिल्पातील नग्नता बिभत्स वाटत नाही.

ग्रीक संस्कृतीत नग्नावस्थेतील पुतळे हे सौंदर्य, आदर्श, शरीरशास्त्र आणि मानवी क्षमतांचे प्रतीक मानले जायचे. विशेषत: पुरुष खेळाडू आणि देवतांचे नग्न पुतळे शारीरिक सामर्थ्य आणि यशाचे प्रतिनिधित्व करत. एकंदरीतच नग्नावस्थेतील शिल्पे ही ग्रीक संस्कृतीचा एक भाग होती असेच म्हणावे लागेल.

डॉ. लैलेशा भुरे,

         नागपूर

  ✒️ संकलन : प्रविण सरवदे, कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या