सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार विषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार  विषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/10/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज येथे महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल अँड इन्स्टिट्यूट इनोवेशन सेल यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘बौद्धिक संपदा अधिकार (Intellectual Property Rights – IPR)’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.  

या सत्रासाठी प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. अविनाश काशिनाथ लवणीस(सहाय्यक प्राध्यापक मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर बीएमआयटी (BMIT), सोलापूर) उपस्थित होते. त्यांनी बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व, पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क तसेच संशोधनातून निर्माण होणाऱ्या नवीन कल्पना व नवकल्पनांचे संरक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संशोधकांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधन निष्कर्ष आणि तांत्रिक आविष्कारांचे संरक्षण करण्यासाठी IPR प्रक्रियेची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये संशोधन, नवीन उपक्रम  आणि बौद्धिक संपदा अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनवृत्ती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्यांनी दिली.

या सत्रामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना बौद्धिक संपदा अधिकार, संशोधनातील नवकल्पनांचे संरक्षण आणि संशोधनाच्या व्यावहारिक उपयोगांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनविषयक जाणीव निर्माण करणे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे हा या सत्राचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल अँड इन्स्टिट्यूट इनोवेशन सेल अंतर्गत करण्यात आले. अशा मार्गदर्शनपर उपक्रमांमुळे संस्थेमध्ये संशोधन संस्कृती विकसित होण्यास आणि विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमशील दृष्टिकोनाला चालना मिळण्यास मदत होत आहे.

या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. लक्ष्मी काळे यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या