कर्माचा हिशोब याच जन्मात होतो - इतिहास हेच सांगतो

 

कर्माचा हिशोब याच जन्मात होतो - इतिहास हेच सांगतो 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/10/2026 :

काल मी अल्लाउद्दीन खिलजीबद्दल वाचत होतो. त्याच्या मृत्यूचं वर्णन वाचून अंगावर काटा आला. पोटात पाणी भरलेलं, शरीर सडायला लागलेलं, शेवटची दोन वर्षे कुष्ठरोगाने तडफडलेला. असा अंत एका बादशहाचा.

चांगल्या माणसाला पण आजार होऊ शकतो, पण जेव्हा असा अंत एका अत्याचारी, क्रूर शासकाचा होतो, तेव्हा मनात पक्का विश्वास बसतो - वाईट कर्माचं फळ इथेच भोगावं लागतं. भोगावं लागलंच पाहिजे.

आणि हा एकटाच नाही. मध्ययुगातील जवळजवळ प्रत्येक अत्याचारी शासकाचा शेवट असाच वेदनादायी झाला आहे. मुघलांमध्ये तर ही परंपराच बनली होती.

अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेब - या सगळ्यांना म्हातारपणी स्वतःच्याच मुलांना एकमेकांचे गळे कापताना बघावं लागलं.

अकबर आपल्या दोन मुलांच्या - मुराद आणि दानियालच्या - मृत्यूनेच खचला होता. त्यातच जहांगीरने बंड केलं, अकबरच्या सगळ्यात जवळच्या माणसांना मारायला सुरुवात केली. अबुल फजलची हत्या केली. म्हातारा अकबर हतबल होऊन फक्त बघत राहिला आणि त्या यातना घेऊनच मेला.

ताजमहलमुळे आपण शाहजहानला प्रेमी समजतो, पण तो सुद्धा इतर मुघलांइतकाच निर्दयी होता. हिंदूंवर तर तो आधीच्यांपेक्षा जास्त कट्टर होता.

त्याचा शेवट तर सगळ्यात भयानक. त्याचा लाडका मुलगा दारा शिकोचं मुंडकं खंजराच्या टोकावर लावून आग्र्यात फिरवण्यात आलं. मग तेच मुंडकं ताटात ठेवून कैदेत असलेल्या शाहजहानपुढे आणलं गेलं. आणि हे करणारा दुसरा कोणी नाही, त्याचाच मुलगा होता.

आपल्या दुसऱ्या मुलांना आपल्या भावाच्या हातून मरताना पाहिलेल्या शाहजहानने कैदेतले शेवटचे दिवस किती यातनेत काढले असतील, याची कल्पनाच केलेली बरी.

हे फक्त यांच्यापुरतं नाही. सत्तेसाठी क्रूरता करणाऱ्या प्रत्येकाचा शेवट दुःख, विश्वासघात आणि यातनेने भरलेला होता. एकही जण शांततेत गादी पुढच्या पिढीकडे देऊ शकला नाही. शेवटी सगळ्यांना सत्तेवरून फेकलंच गेलं.

म्हणूनच मला वाटतं, इतिहासाच्या पुस्तकात फक्त राजांनी काय जिंकलं हे नाही, तर ते कसे मेले हे पण शिकवलं पाहिजे.

लोकांना कळलं पाहिजे की कर्माचा हिशोब याच जन्मात द्यावा लागतो.

सभ्य समाज घडवायचा असेल, तर क्रूर शासकांचा हा दुःखद अंत प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या