AJ गावठी मलई चहाच्या मुख्य शाखेचा शेटे व्यापारी संकुल येथे शुभारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/10/2026 :
AJ गावठी मलई चहाच्या मुख्य शाखेचा शेटे व्यापारी संकुल गाळा नंबर 3, अकलूज येथे आज बुधवार दिनांक 14/10/2026 रोजी शुभारंभ झाला.
याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे, इंद्रजीत दिपक इंगळे, अनिकेत नागणे, वरूण चव्हाण, आदित्य बापूराव माने, वैभव वैरागकर, सुरज दणाने, राज फडतरे, महेश पवार, यांच्यासह शेटे व्यापारी संकुल मधील गाळाधारक आणि मान्यवर उपस्थित होते.
"कुणाला दारूच्या बाटलीत तर कुणाला मुलींच्या ओठात मिळतो पण त्याहून जास्त आनंद आम्हाला चहाच्या एका घोटात मिळतो" असे ब्रीदवाक्य असलेल्या एजे गावठी मलई चहा चे प्रोप्रायटर अजय अशोक जाधव यांनी उपस्थितांचे येथोचित स्वागत आणि सन्मान केला.


0 टिप्पण्या