🟡 ओंकार साखर कारखाना ऊसास उच्चांकी दर देणार - बाबुराव बोत्रे पाटील
🟢 ओंकार परिवार प्रतिदिन ऊसाचे 2 लाख 5 हजार टनाचे गाळप; 23 लाख लिटर इथेनॉलची निर्मिती
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/10/2026 :
ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथील ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदापुरी चे सरपंच जयवंत सुळ होते.
बोलताना बोत्रे पाटील म्हणाले की मी एका शेतकरी कुटुंबातील असुन शेतकऱ्यांना काय अङचणीचा समाना करावा लागतो याची जाणीव मला असुन ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, कर्मचारीवर्ग यांचे हित जोपणारा परिवार असुन गेल्या सहा वर्षीपासून ऊस कारखानदरीत असुन आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर दिला असुन वाहतूकदारांच्या समस्या सोङविल्या.
कर्मचारीवर्गाला 20 % पगारवाढ दिली आहे. 2026 - 2027 गळीत हंगामाच्या ऊसास निश्चितपणे सर्वात जास्त दर देण्यासाठी कटिबद्ध असुन आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीस ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर व 100/- रूपये बील अदा केले जाईल. ओंकार परिवार प्रतिदिन 2 लाख 5 हजार मे. टन ऊसा चे गाळप, 23 लाख लिटर इथेनॉल 228 मॅगवेट वीज निर्माण करणारा देशातील सर्वात मोठा साखर उद्योग आहे. त्याबरोबर मेडीकल काॅलेजच्या माध्यमातून आरोग्याच्या अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकारला घालावा. असे आवाहन बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोत्रे पाटील, प्रा. शारदाताई बोत्रे पाटील, जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे, तेजस्विनी बर्गे, तरंगफळचे माजी सरपंच रावसाहेब तरंगे, नारायण करचे, सर्जेराव पवार, भगवान सुळ, संजय वाघमोङे यासह बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुकदार, आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.आभार रामभाऊ मगर यांनी मानले.


0 टिप्पण्या