✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार

 

✍️ HAPPY  THOUGHTS आनंदी विचार

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/9/2026 :

समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की बऱ्याच गोष्टींचा वाद मिटतो. अज्ञान आणि आडमुठेपणा यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की बऱ्याच गोष्टींचा वाद पेटतो.

जीवनात काय होईल ही भीती का बाळगायची, प्रत्येकवेळी वाईट होईल हाच विचार का करावा,

ध्येयासाठी पुढे पुढे चालत राहा. काहीच मिळालं नाही. तर निदान नवा अनुभव तरी मिळेल. सुख मिळालं की ते उपभोगायचं, पण मिरवत नाही बसायचं. आणि दुःख झालं तर पचवायचं, पण गिरवत नाही बसायचं. हीच जिवनांतली खरी रीत आहे,

योग्य वेळ कधीच येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवून योग्य वेळ निर्माण करा आणि उडी टाका.

आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे,

शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं, ते तरी कुठे सोबत नेता येणार.

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही. पान उलटले की जुने काही आठवत नाही. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल. पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.

माणसाने इतरांपेक्षा वेगळे बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही तर विचार आणि स्वभावाने बना. कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात. मात्र  माणसाचे विचार आणि संस्कार शेवट पर्यंत साथ देत असतात,

श्रीमंतीची व्याख्या आजवर कुणालाच करता आली नाही, जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढीच तुमची असते. जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते. ओझं सांभाळण्यापलिकडे त्याचा काही फायदा नसतो.

रस्ता चुकणं चुकीचं नसतं. मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असत,

✍️ प्रा. एस. एम. पाटील

  देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड,

   ┈┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉┈

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या