🔰 श्रावणमास समाप्ती निमित्त शंकरनगर येथील श्री शिवपार्वती मंदिरात महाआरती संपन्न
🟣 महाशिवरात्र यात्रा समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर अकलूजचा उपक्रम
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 8/9/2026 :
अकलुज येथील महाशिवरात्र यात्रा समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर यांच्या वतीने पवित्र श्रावण मासाच्या समाप्ती सोमवार दिनांक 07/09/2026 रोजी सायंकाळी 7.00 वाजता शंकरनगर येथील श्री शिवपार्वती मंदिरात महाआरती संपन्न झाली.
श्रावण महिन्याभर नामजप, शिवलीलामृत ग्रंथवाचन, हरिपाठ, प्रत्येक सोमवार लघुरुद्र अभिषेक आयोजन करण्यात आले होते. नागपंचमी सणानिमित्त पर्वती मंदिरावर दोन दिवस सांस्कृतिक वारसा असणा-या विविध पारंपारिक खेळ व उपक्रमाचे आयोजन केलेले होते. यामध्ये हजारो महिला, मुली पारंपारिक वेशभूषेत सहभागी होवून खेळाचा आनंद लुटला श्रावण महिन्यातील चौथा सोमवार दिनांक 07/09/2026 रोजी सायंकाळी 07.00 वाजता शिवपार्वती महाआरती संपन्न झाली. नंतर हर हर महादेवा पार्वती शंकर सदाशिवा हा नाम जप होऊन प्रसाद वाटप करण्यात आले तसेच शोभेची दारु कामाचे सुंदर देखावे व तोफा उडवण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील महाशिवरात्र यात्रा समितीचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील व सौ. कांचनमालादेवी मदनसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील, संचालिका कु. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन शंकरराव रामचंद्र माने- देशमुख व संचालक मंडळ यांचेसह पुरुष व महिला भाविक, माळशिरस तालुका परिसरातील भाविक साधारण 14 ते 15 हजार उपस्थित होते.

0 टिप्पण्या