लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न

 

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

यशवंतनगर प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर येथे शालेय विज्ञान प्रदर्शन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि सर्जनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते-पाटील व श्रीमती कै.रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाले. स्थानिक प्रशाला समितीच्या सदस्या सौ. कोमल देशमुख व सौ. अश्विनी माने, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले व्याख्याते अशोक भोसले  व इतर मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध विज्ञानविषयक प्रकल्पांचे मान्यवरांनी अवलोकन करून विद्यार्थिनींचे कौतुक केले. तसेच प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर अशोक भोसले  यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तर्कशुद्ध विचार, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पवार यांनी अभिनंदन केले व विद्यार्थिनींना भविष्यातही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. रणनवरे, सौ. लोंढे , सौ. पठाण  तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या