⛳ पराभव न मानणारी वृत्ती..
न झुकणारा स्वाभिमान !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/9/2026 :
इतिहासाच्या प्रत्येक पानावर अनेक राजांची नावे सापडतील, पण छत्रपती संभाजी महाराज हे नाव केवळ इतिहासात नाही; तर ते मनात, रक्तात आणि स्वाभिमानात कोरलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे पराक्रमाची केवळ कथा नाही, तर संकटांशी लढण्याची जिवंत शिकवण आहे. चारही बाजूंनी शत्रू, राजकीय डावपेच, विश्वासघात आणि अमानुष अत्याचार तरीही महाराजांचा स्वाभिमान कधीही झुकला नाही.
ते जाणून होते देह जाऊ शकतो, पण विचार झुकले तर इतिहास हरतो. कैदेत असतानाही त्यांनी स्वराज्य आणि आत्मसन्मान यांचा सौदा केला नाही. कारण छत्रपती संभाजी महाराजांसाठी राजसत्ता महत्त्वाची नव्हती, तर स्वराज्य सर्वोच्च होते. त्यांचा मृत्यू हा पराभव नव्हता, तो अखंड स्वाभिमानाचा विजय होता. म्हणूनच आजही त्यांचं नाव घेतलं की छाती अभिमानाने ताठ होते, आणि डोळ्यांतून नकळत आदर झरतो.
आजच्या काळात, थोड्या अडचणीत हार मानणाऱ्या मनांना संभाजी महाराज आठवायला हवेत. कारण ते सांगून गेले, परिस्थिती कितीही कठीण असली, स्वाभिमान जपला तर इतिहास तुमच्या बाजूने उभा राहतो. म्हणूनच पराभव न मानणारी वृत्ती, आणि न झुकणारा स्वाभिमान यांचं जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
🚩🚩🚩

0 टिप्पण्या