स्मृतीभवन येथे आज"गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ"
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/9/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड अँड रिसर्च शंकरनगर - अकलूज अभियांत्रिकी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शैक्षणिक, कला व क्रिडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा "गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ" मंगळवार दि.२९/०९/२०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृतिभवन येथे शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज चे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे संकल्पनेतून, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे शुभहस्ते आयोजित करणेत आलेला आहे.
महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती सूचना करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या