विचारधारा

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 9/9/2026 :

आपण भारतीय संस्कृतीतील अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतो; पण त्यामागील आध्यात्मिक व वैज्ञानिक कारणे तुम्ही कधी समजून घेता का? हे सण साजरे करण्यामागचा मूळ हेतू काय आहे? संस्कृतीला यातून आपल्याला नेमके काय शिकवायचे आहे?

आपण नुकतीच गोकुळाष्टमी व दहीहंडी साजरी केली. बाळकृष्णाचे आवडते दही-दूध-लोणी यांचे मिश्रण करून दहीहंडी फोडली आणि पौष्टिक प्रसादाचा आस्वाद घेतला. ती उंच बांधलेली दहीहंडी फोडताना आपण मानवी मनोरे रचले; एकमेकांच्या साहाय्याने थर लावले, आधार दिला, तोल सावरला आणि सर्वांच्या एकजुटीतून आपण ते ध्येय गाठले.

मुलांनो, आपल्या प्रत्यक्ष जीवनातसुद्धा अगदी असेच असते. अनेकांच्या सहकार्याशिवाय आणि आशीर्वादांशिवाय आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. कोणी आपल्याला भक्कम आधार देते, तर कोणी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करते; पण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रेमळ हात आपल्याला उभारी देतात व संकटात सावरतात.

जीवनातील यशाच्या दहीहंडीपर्यंत पोहोचायचे असेल, तर ते केवळ परस्पर सहकार्यातून आणि एकतेतूनच साध्य होऊ शकते!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या