जसे आहात तसेच रहा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 8/9/2026 :
उषा ने एका तासात १० KM अंतर कापले. आकाशने तेच अंतर दीड तासात पूर्ण केले.
दोघां पैकी तंदुरुस्त कोण ? किंवा कोणाचा फिटनेस चांगला ?
अर्थात सर्वांचे उत्तर *उषा असेल. उषाने हे अंतर तयार केलेल्या ट्रॅकवर पूर्ण केले तर आकाशाने दगड-मातीच्या वाटेने चालत असे म्हटले तर ???मग सर्वांचे उत्तर आकाश असेल. पण जेव्हा आम्हाला कळले की उषा ५० वर्षांची आहे तर आकाश २५ वर्षांचा आहे ?? मग सर्वांचे उत्तर पुन्हा उषा असेल. पण आम्हाला हे देखील कळले की आकाशचे वजन तब्बल १४० किलो आहे तर उषाचे वजन ६५ किलो आहे.
पुन्हा सर्वांचे उत्तर आकाश असेल जसे आपण आकाश आणि उषा बद्दल अधिकाधीक माहिती मिळवतो, तसे तसे कोण चांगले आहे याबद्दल आपली मते भिन्न होतात आणि निर्णय बदलतात.
जीवनाचे वास्तवही असेच आहे.
आपण प्रत्येकाबद्दल खूप वरवर आणि घाईने आपले मत तयार करतो, ज्यामुळे आपण स्वतःला आणि इतरांना न्याय देऊ शकत नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या संधी मिळतात. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. प्रत्येकाची साधन-संपत्ती भिन्न आहे. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचे उपाय वेगवेगळे आहेत. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची, संपत्तीची, परिस्थितीची अथवा जीवनाची श्रेष्ठता कोणाशी तुलना करण्यात नाही तर स्वतःची परीक्षा घेण्यामध्ये आहे. तुम्ही सर्वोत्तम आहात, तुम्ही जसे आहात तसेच रहा आणि तुमच्या परिस्थितीनुसार सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करत रहा.
संकलन - आनंद महाजन
योग प्रशिक्षक, अमरावती.
९४२२९४९५६४
*******************
0 टिप्पण्या