मूळव्याधीचा त्रास वाढवू शकतात ‘हे’ पदार्थ; आजच आहारातून करा हद्दपार!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/9/2026 :
_Unhealthy Food: मूळव्याधीचा त्रास असताना कब्ज वाढवणारे, पचनास त्रास देणारे किंवा शौचाच्या वेळी जळजळ वाढवणारे पदार्थ शक्यतो टाळणे किंवा कमी करणे फायदेशीर ठरू शकते._
*Unhealthy Food:* मूळव्याधीचा त्रास आजकाल अनेक लोकांमध्ये आढळून येतो. बद्धकोष्ठता, शौचाच्या वेळी जास्त जोर लावणे, दीर्घकाळ बसून राहणे, आहारातील तंतूंचे कमी प्रमाण आणि अपुरी शारीरिक हालचाल यांसारख्या कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो. मूळव्याधीचा त्रास असल्यास आहार, पाणी आणि शौचाच्या सवयींमध्ये काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे असते. यासाठी भरपूर पाणी प्यावे, फळे, भाज्या, कडधान्ये आणि तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करावा. मात्र, अनेकदा रुग्ण नकळत असे काही पदार्थ खातात, ज्यामुळे हा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतो.
मूळव्याधीचा त्रास असताना कब्ज वाढवणारे, पचनास त्रास देणारे किंवा शौचाच्या वेळी जळजळ वाढवणारे पदार्थ शक्यतो टाळणे किंवा कमी करणे फायदेशीर ठरू शकते.
*मूळव्याध असल्यास काय खाऊ नये?*
- *अतितिखट पदार्थ:* भरपूर लाल तिखट, हिरवी मिरची, गरम मसाले यांचे सेवन केल्याने काही लोकांमध्ये शौचाच्या वेळी जळजळ आणि अस्वस्थता वाढू शकते.
- *जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ:* वडा, भजी, समोसा, पुरी, फ्रेंच फ्राइज यांसारख्या पदार्थांचे सेवन कमी असावे. असे पदार्थ आहारातील फायबर कमी करू शकतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.
- *फास्ट फूड आणि जंक फूड:* पिझ्झा, बर्गर, नूडल्स, चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स यांमध्ये फायबर कमी आणि चरबी/मीठ जास्त असू शकते, त्यामुळे याचे नियमित सेवन टाळणे चांगले.
- *मैद्याचे पदार्थ:* मैद्याची बिस्किटे, नान, पेस्ट्री, केक, पांढरा ब्रेड यांचे जास्त सेवन टाळावे, त्याऐवजी संपूर्ण धान्यांचे पदार्थ निवडणे चांगले.
- *प्रक्रिया केलेले मांस:* साॅसेज, सलामी, बेकन यांसारखे प्रक्रिया केलेले मांस नियमितपणे खाणे टाळावे. यामध्ये फायबर नसते.
- *अति गोड पदार्थ:* केक, पेस्ट्री, मिठाई, डोनट्स आणि इतर अतिगोड पदार्थांचा अतिरेक टाळावा. अशा पदार्थांऐवजी फायबरयुक्त पर्याय निवडता येतो.
- *चिप्स आणि पॅकेज्ड स्नॅक्स:* यामध्ये फायबर कमी असते आणि मीठ-चरबीचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे मूळव्याधीच्या काळात यांचे सेवन कमी करावे.
- *अति कॅफिनयुक्त पेये:* चहा-काॅफी पूर्णपणे बंद करण्याची गरज प्रत्येकाला नसते; मात्र त्यांचे अतिसेवन पाळावे आणि दिवसभर पुरेसे पाणी प्यावे.
- *मद्य:* मद्यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडू शकते, त्यामुळे मूळव्याधीचा त्रास असताना मद्यप्राशन टाळणे योग्य.
- *कमी फायबर असलेला आहार:* फक्त पांढरा भात, मैद्याचे पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांवर आधारित आहार टाळावा. फायबर आणि पाण्याची कमतरता बध्दकोष्ठता वाढवू शकते, त्यामुळे हा मुद्दा विशेष महत्त्वाचा आहे.
- *एक महत्वाची गोष्ट:* प्रत्येक व्यक्तीला तिखट, चहा-काॅफी किंवा विशिष्ट पदार्थांमुळे त्रास होतोच असे नाही, त्यामुळे कोणता पदार्थ खाल्ल्यानंतर जळजळ, वेदना किंवा बध्दकोष्ठता वाढते हे लक्षात घेऊन तो पदार्थ कमी करावा. मूळव्याधीत मुख्य उद्देश मल मऊ ठेवणे आणि शौचाच्या वेळी जोर लावणे टाळणे हा असतो.
- संकलन : यशवंत वाघ
************************

0 टिप्पण्या