तुमच्या वीज मीटरचा लाल लाईट वेगाने ब्लिंक होतो? तर मीटर नव्हे, आधी तपासा घरातला 'हा' फॉल्ट!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 8/9/2026 :
आपण अनेकदा घरात विजेचा वापर कमी करतो, मात्र वीज बिल प्रचंड येते. अशावेळी आपण थेट वीज मीटरमध्येच बिघाड असल्याचा निष्कर्ष काढून मोकळे होतो. अनेकदा तर, मीटरवरील लाल रंगाचा लाईट अधिक वेगाने ब्लिंक होताना दिसला की मीटर बदलण्यासाठी महावितरण अथवा वीज कंपनीकडे धाव घेतो. मात्र सम्या काही वेगळीच असते. यामुळे मीटर खराब झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी, घरातील वायरिंग व्यवस्थितपणे तपासणे आवश्यकत आहे. यासंदर्भात, इंजिनिअर अंकितने लाल दिवा वेगाने ब्लिंक होण्यामागचे कारण सांगितले आहे, जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवे.
यामुळे वेगाने ब्लिंक होते मीटरवरचा लाल लाइट? -
घरात कुठल्याही प्रकारचा मोठा वीज भार नसतानाही, जर मीटरवरील रेड लाईट वेगाने ब्लिंक होत असेल आणि बिल अधिक येत असेल, तर त्यामागे काही महत्वाची कारणे असू शकतात.
- अनेकदा घरातील वायरिंगमधील अतिशय छोट्या दोषांमुळेही मीटर वेगाने फिरू लागतो.
फॅन बॉक्स किंवा बोर्डमधील बिघाड -
जर फॅन बॉक्समधील एखाद्या वायरचे इन्सुलेशन खराब होऊन ते धातूच्या एखाद्या भागाला स्पर्श करत असेल तर वीज गळती होते. यामुळे वापर न होताही मीटर वेगाने फिरते. यामुळे, असे होत असल्यास, इलेक्ट्रिशियनला बोलावून प्रत्येक स्विच बोर्ड, प्लग, फॅन बॉक्स आणि संपूर्ण वायरिंगचे कनेक्शन टप्प्याटप्प्याने तपासून घ्यायला हवे.
महत्वाच म्हणजे, जर मीटरवरील लाल लाईट ब्लिंक होण्याऐवजी सतत सुरू राहत असेल आणि काही वेळाने स्वतःच ब्लिंक होऊ लागत असेल, तर ही सहसा मीटरमधीलच तांत्रिक खराबी असू शकते. अशा वेळी संबंधित वीज कंपनीशी संपर्क साधून मीटर तपासून घेणे अथवा बदलून घेणे योग्य ठरते.
====================
0 टिप्पण्या