🍀 रानभाजी - खुरासणी 🍀
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/9/2026 :
खुरासणी (खुरसनी, कारळे) ही वनस्पती पावसाळ्यात डोंगराळ व ग्रामीण भागात रानभाजी म्हणून उगवते. या वनस्पतीच्या पानांची किंवा बियांची भाजी केली जाते, जी आरोग्यासाठी गुणकारी असते. ही भाजी शरीरातील वात विकार कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. खुरासणी च्या काळ्या बीयांपासून केलेली तिखट चटणी नाचणीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत चवदार लागते.
*भाजी बनवण्याची कृती*
*साहित्य*- खुरासणीची कोवळी पाने व शेंडे, बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ, हळद, तेल.
*कृती*- खुरासणीची कोवळी पाने निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण आणि कांदा परतून घ्या. त्यात चिरलेली भाजी घालून चांगली परतून घ्या. चवीनुसार मीठ व तिखट घालून भाजी झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यावी.
*भाजी बनवण्याची कृती*
https://youtu.be/zmb75lTmqAQ?si=mZm0t-JFz5JXJDfp
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : इंटरनेट

0 टिप्पण्या