जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालय, रेठरे बु. च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा "दीक्षारंभ" संपन्न

जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालय, रेठरे बु. च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा "दीक्षारंभ" संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/9/2026 :

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., रेठरे बु.।। संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालय, रेठरे बु.(महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न) ता. कराड जिल्हा सातारा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा "दीक्षारंभ" कार्यक्रम सोमवार दि. 28/09/2026 रोजी सकाळी 10.00 वा. संपन्न झाला. 


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाजीराव सुतार (मॅनेजिंग डायरेक्टर, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., रेठरे बु) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. प्रशांत नाईकवाडी (राष्ट्रीय अध्यक्ष, रेसिड्यु फ्री अँण्ड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन (रोमिफ इंडिया) यांना निमंत्रित केलेले होते. व यावेळी विद्यार्थ्यांसाठी त्यांचे "अवशेष मुक्त तसेच सेंद्रिय शेती, गरज, आव्हाने व संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. अशोक फरांदे (प्राचार्य जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालय, रेठरे बु)  संग्राम पाटिल  (संचालक य. मो. कृष्णा सह. सा. का. लि., रेठरे बु),  चारुदत्त देशपांडे (एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर य. मो. कृष्णा सह. सा. का. लि., रेठरे बु) आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या