विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 8/9/2026 :
पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धती होती आणि कुटुंबात मुलांची संख्याही पुष्कळ असे. घरात आजी-आजोबा, आत्या, काका-काकू आणि चुलत, मावस, आत्ये, मामे अशी भावंडांची मोठी जत्रा भरलेली असे; तसेच आजोळी मामा-मामी आणि मावशी असे अनेक जिव्हाळ्याचे नातलग असत.
आता मात्र विभक्त कुटुंबे आणि घरात एक किंवा दोनच मुले असतात; त्यामुळे या समृद्ध कौटुंबिक नात्यांचा आनंद मुलांना सहज अनुभवता येत नाही. भरपूर भावंडे, माया करणारे आणि रंजक गोष्टी सांगणारे प्रेमळ आजी-आजोबा आता दुर्मिळ झाले आहेत.
मुलांनो, आजी-आजोबांचे निखळ प्रेम, त्यांनी सांगितलेले जीवनोपयोगी अनुभव आणि त्यांनी दिलेले संस्कार यांतूनच आपले व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने घडते. त्यांच्या प्रेमळ कुशीत एक अनोखी सुरक्षितता वाटते. आई-बाबा जरी कामात व्यग्र असले, तरी आजी-आजोबा आपल्याला हक्काने पूर्ण वेळ देतात.
जेव्हा तीन पिढ्या एका छताखाली एकत्र नांदतात, तेव्हा जुन्या पिढीचा समृद्ध सांस्कृतिक वारसा नव्या पिढीकडे अगदी सहजतेने संक्रमित होतो!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या