मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 9/9/2026 :
समाजात वावरताना सर्वधर्मसमभाव आणि स्त्री-पुरुष समानता ही जीवनमूल्ये आपण आचरणात आणावीत, ही सर्वसाधारण अपेक्षा असते. प्रत्येकाने आपल्या वागण्या-बोलण्यातून त्याचा प्रामाणिकपणे अंगीकार केला पाहिजे.
मात्र प्रत्यक्षात तसा अनुभव येत नाही; आपण बोलतो तसे वागत नाही. आजही समाजातील विचारांतून अस्पृश्यता, वैधव्याच्या अनिष्ट रूढी आणि जातपात या गोष्टी जात नाहीत. सधवा-विधवा असा भेदभाव करून अनेकदा स्त्रियाच स्त्रियांना अधिक दुःखी करतात.
पतीच्या निधनानंतर सर्वस्व गमावल्याच्या अतीव दुःखात त्या माऊलीला भक्कम आधार देण्याऐवजी, तिची सौभाग्याची लेणी हिरावून घेऊन आपण तिला अजून दुःखी करतो. कपाळावर कुंकू न लावण्याची जणू तिला कठोर शिक्षाच दिली जाते; काय साध्य होते या जुनाट रूढींमधून?
आजचा संकल्प
पती-पत्नीमध्ये दुर्दैवाने पतीचे आधी निधन झाले, तर त्या स्त्रीला समाजात सन्मानाने व निर्भयपणे जगण्याचे मानसिक बळ देऊ. तिला केवळ 'विधवा' म्हणून उपेक्षित न ठेवता योग्य मान-सन्मान देऊ आणि एका चांगल्या प्रथेची सुरुवात करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या