मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 8/9/2026 :

दैनंदिन जीवनात वावरताना, परस्परांशी बोलताना किंवा व्यवहारात आपल्या प्रत्येकाकडून कधी ना कधी काही चुका होतातच; कधी त्या किरकोळ असतात, तर कधी एखादी मोठी घोडचूकही होते.

आपल्या चुकीचे दुष्परिणाम अनेकदा इतरांना भोगावे लागतात; ते शारीरिक, मानसिक, भावनिक अथवा आर्थिक स्वरूपाचे असू शकतात. त्यामुळे एखादी व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर दुखावते, कोणाचे कौटुंबिक स्वास्थ्य ढासळते, तर कोणाचे सामाजिक स्थान अडचणीत येते.

झालेली चूक मनापासून मान्य करणे आणि दिलगीर होऊन माफी मागणे ही प्रत्येकाची मोठी नैतिक जबाबदारी आहे. ती चूक अजाणतेपणी झाली असो वा जाणीवपूर्वक, अंतःकरणातून क्षमा मागणे आणि तिची पुनरावृत्ती न करणे हे प्रत्येकाला जमले पाहिजे.

आजचा संकल्प

आपल्याकडून शक्यतो कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घेऊ; झालीच तर ती वेळीच सुधारू, समोरच्याची मोठ्या मनाने माफी मागू आणि अधिक जबाबदारीने बोलू व वागू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या