मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/9/2026 :
दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक प्रकारचे ताणतणाव असतात. त्यातून मनावरचा ताण सातत्याने वाढत जातो; परिणामी विविध शारीरिक तक्रारी सुरू होतात आणि संपूर्ण जीवनात एक प्रकारची निराशा येते.
आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी आतील मानसिक ताकद वाढवणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा ठरतो. स्वतःबद्दल विचार करताना किंवा आपल्या आरोग्याविषयी बोलताना या सकारात्मक भावना आपल्याला जगण्याची नवी ऊर्जा देतात.
बाह्य परिस्थितीचे शांतपणे निरीक्षण करणे, जे आपल्या आवाक्यात आहे ते प्रामाणिकपणे करणे, जे शक्य नाही ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे अन्यथा व्यर्थ गोष्टींचा विचार पूर्णपणे टाळणे... यामुळेच मानसिक ताण कमी राहतो.
आजचा संकल्प
भावनिक समतोल, दृढ आत्मविश्वास, कणखर विचारसरणी आणि अचूक निर्णयक्षमता यांच्या साहाय्याने प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊ आणि तणावमुक्त आनंदी जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या