विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/9/2026 :
आज श्रावण अमावास्या, म्हणजेच *श्रावणी बैलपोळा*! शेतकरी बांधवांचा खरा सोबती, आपल्या अपार कष्टाने शेतजमीन फुलवणारा आणि मातीशी अतूट नाते जपणारा आपला 'बैलराजा'... त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा पावन दिवस!
बाराही महिने शेतात राबणारा, कडक ऊन असो वा पावसातील चिखल, शेतकरी मालकाबरोबर अखंड नांगरणी-पेरणी करून धरणीमातेला हिरवीगार व समृद्ध बनवणारे हे बैल बळीराजाचे खरे आधारस्तंभ असतात.
मुलांनो, बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना नदीवर स्वच्छ धुऊन, शिंगांना हिंगूळ लावून, सुंदर नक्षीने नटवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला जातो. वाजतगाजत त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते. भगवान शिवशंकराचा नंदी समजून त्यांना मनोभावे वंदन केले जाते.
पशू-पक्षी आणि प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे हे आपले पारंपरिक कृषी सण आपण सर्वांनी मोठ्या आनंदाने साजरे करूया!
सौ. स्नेहलता स. जगताप.
=================

0 टिप्पण्या