✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार

 


✍️ HAPPY  THOUGHTS आनंदी विचार 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 9/8/2026 :

माणसांच्या जीवन पाप आणि पुण्य ह्या दोन गोष्टी येतात. तुमच्या कर्मानुसार जे जास्त तसं फळ मिळते.

"जैसा कर्म करेगा, वैसा फल देगा भगवान".

पाप हे आपल्या डोळ्यातून प्रवेश करते.

दृष्टी बिघडली की, विचार बिघडतो.

विचार बिघडला की, उच्चार बिघडतो.

उच्चार बिघडला की, आचार बिघडतो.

आणि यामुळेच मन, बुद्धी, चित्त खराब होत असते. मनात आले ते मेंदूने इंद्रियांना आदेश दिले की मग पाप पुण्य होतं.

मन जिंका, इंद्रिय जिंकाल.

इंद्रिंय जिंकले की जग जिंकता येत.

मनाचा ताबा उत्तम दिशा,

मानसशास्त्रानुसार जर तुम्ही एखादे मोठे काम करत असाल आणि तुमच्यासोबत कोणीही उभे नसेल तर तुमच्या जिंकण्याची शक्यता जास्त असते.

कारण त्यात फक्त तुमचे मन काम करते, घसरलेला पाय सावरता येईल, पण बोललेला शब्द सावरता येणार नाही.

अनावधानाने चूक झालेली सज्जन माणसे त्यावर बराच पश्चाताप करून घेतात. परंतु जाणून बुजून चूक केलेली दुर्जन माणसे मात्र एक मोठा पराक्रम केल्याच्या अविर्भावात राहतात आणि वावरतात,

संगत आणि पंगत यावर भविष्य घडत असतं. संगत कान भरणाऱ्यांची नको.

ळतुमची संगत अशी ठेवा, जी तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही,

✍️ प्रा. एस. एम. पाटील

 देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड, 

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या