मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 9/8/2026 :

जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण निरंतर प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नसते. अशा वेळी जे लोक यशस्वी होतात, त्यांच्याबद्दल मनात नकळत असूया निर्माण होते.

"ते यशस्वी होतात, मी का नाही? मी कुठे कमी पडतोय? माझे काय चुकतेय?" आणि मग येथूनच खरा आत्मशोध सुरू होतो. आत्मनिरीक्षणातून माणूस जेव्हा स्वतःच स्वतःच्या त्रुटी शोधतो, तेव्हा प्रगतीचा योग्य मार्गही आपोआप सापडतो.

एक नक्की, कोणाचाही द्वेष करण्याऐवजी त्यांना गुरू माना; त्यांच्या यशाला मनापासून शुभेच्छा द्या. जे मागे राहिलेले असतील, त्यांना मदतीचा हात द्या. तुम्ही सतत सत्कर्म करत राहा, तुम्हालाही गरज असेल तेव्हा हात देणारा कोणीतरी नक्कीच भेटेल.

आजचा संकल्प

द्वेषभावना मनात न ठेवता सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागू, निःस्वार्थपणे गरजूंना मदत करू. 'सत्कर्माची फळे नक्की मिळतात' यावर विश्वास ठेवू व आपले जीवन सार्थकी लावू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या