विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 9/8/2026 :
आज ९ ऑगस्ट म्हणजेच _'ऑगस्ट क्रांती दिन'_ व _'जागतिक आदिवासी दिन'_. या दोन्ही दिवसांचे महत्त्व तुम्हाला माहीत आहे का?
९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी व इतर क्रांतिकारकांनी मुंबई येथील ऐतिहासिक क्रांती मैदानावरून ब्रिटिशांविरुद्ध 'चले जाव!' ची घोषणा केली. तिथून खऱ्या अर्थाने भारताची पूर्ण स्वातंत्र्याच्या दिशेने घोडदौड सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात हा दिवस 'क्रांती दिन' म्हणून गौरविला जातो.
तसेच, आजचा दिवस 'जागतिक आदिवासी दिन' म्हणूनही साजरा केला जातो. जल, जमीन व जंगल यांचे रक्षण करणारे, निसर्गाशी घट्ट नाते जपणारे आणि पर्यावरणाचे खऱ्या अर्थाने रक्षण करणारे आपले आदिवासी बांधव हे समाजाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.
तमाम आदिवासी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि सर्व भारतवासीयांना ऑगस्ट क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या