भारतातली एकमेव नदी..जी उलट्या दिशेने वाहते !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 7/8/2026 :
भारत देशात १०० हून अधिक मुख्य नद्या, तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत. भारतातील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. पण, देशात अशी एकमेव नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे उलट वाहते.
पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या या नदीचे नाव नर्मदा असून या नदीला रेवा या नावाने सुद्धा ओळखले जाते. भारतातील सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. परंतु, नर्मदा ही देशातील अशी नदी आहे, जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही नदी मध्यप्रदेश आणि गुजरात मधील एक मुख्य नदी आहे, जी भारताच्या मध्य भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नर्मदा नदी मध्यप्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील अमरकंटक पठारावर उगम पावते.
नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहाचे भौगोलिक कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅलीचा उतार विरुद्ध दिशेने आहे, यामुळे नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. भौगोलिक स्थितीनुसार नर्मदा नदी सोनभद्रा नदी पासून एका विशिष्ट बिंदूवर विभक्त होते. नर्मदा नदी तिच्या उगमापासून पश्चिमेला १३१२ किमी प्रवास करते आणि अरबी समुद्राला मिळते. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याची जीवनदायिनी नदी आहे. अरबी समुद्रास जाऊन मिळण्यापूर्वी, नर्मदा नदी १३१२ किमी लांबीच्या मार्गाने मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या प्रदेशातून पाणी वाहून नेते. नर्मदा नदीला ४१ उपनद्या आहेत. यामध्ये २२ नद्या डाव्या तीरावर आणि १९ नद्या उजव्या तीरावर मिळतात.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
====================

0 टिप्पण्या