🟢 माजी उपमुख्यमंत्री "विजयदादां"च्या हस्ते उद्या सकाळी 10 वा. मोफत आरोग्य शिबिराचा उद्घाटन समारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 7/8/2026 :
स्व. श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०२ व्या जयंती निमित्त शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट, शंकरनगर- अकलूज, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि,शंकरनगर- अकलूज, सयाजीराजे मित्र मंडळ अकलूज, उपजिल्हा रुग्णालय अकलूज व प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक ०८/०८/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलूज चे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नाई संकुल - जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज येथे संपन्न होणार आहे.


0 टिप्पण्या