✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार


 ✍️ HAPPY  THOUGHTS आनंदी विचार 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 17/7/2026 :

आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा.

न कळत दुसऱ्याच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेलं हसू हेच तर खरं पुण्य आहे. कारण पुण्य ठरवून करता येत नाही.

निस्वार्थ केलेल्या कृतीतून ते आपोआप तुमच्या पदरात पडतं. आणि पुण्य कुठे विकतही मिळत नाही ते कमवाव लागतं, पुण्य म्हणजे सत्कर्माच्या ठेवीवर मिळणारे व्याज.

आपल्या समोर केलेल कौतुक ही आपली स्तुती असते. तर आपल्या माघारी केलल कौतूक हे आपल खर अस्तित्व असत.

मनात राहणाऱ्या माणसांपेक्षा मन ओळखणारी माणसं जास्त गरजेची असतात आपल्या आयुष्यात,

कंदील जरी सूर्याची बरोबरी करत नसेल, तरी अंधारात त्याचं महत्व सूर्या एवढच असतं. त्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका. कोण हसवून गेला कोण फसवून गेला हे महत्त्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला ते महत्त्वाचं आहे.

गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा, येणाऱ्या क्षणासाठी मनमोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित गेलेल्या क्षणापेक्षा हि आयुष्यात चांगले दिवस येतील.

मैत्री ही रक्ताची नसते, पण रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असते,

मुखी साखरेचा गोडवा                                असावा​।

मनी कुणाचा कधी द्वेष नसावा॥

जोडावी माणसे, जपावी नाते​।

विसरून व्यवहारी, फायदे तोटे॥

क्षणांचे मणी, अलगद ओवावे​।

✍️ प्रा. एस. एम. पाटील 

 देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

संकलन : प्रविण सरवदे, कराड,

   ꧁꧂🥳꧁꧂

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या