पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई ; नऊ लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चोरी घरपोडीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस

 


पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई ; नऊ लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चोरी घरपोडीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस

वृत्त एकसत्ता न्यूज

पंढरपुर : शहर पोलीस ठाणे गु. र.नं.311/2026 भारतीय न्याय संहिता-2023 चे क. 303(2)   प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी शोभा आबासाहेब निलंगे, रा. शिक्षक कॉलनी, माळशिरस जिल्हा सोलापूर.  हे दिनांक  रोजी 17/04/2026  रोजी दुपारी 02/30 वा चे सुमारास माळशिरस ते पंढरपूर बसने प्रवास करत असताना 28 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र किंमत 3,45000/- तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे चालू भावाप्रमाणे पंढरपूर बस स्थानक येथून अज्ञात चोरट्याने चोरी केलेले होते. 

त्यानंतर सदर गुन्हयाचा तपास चालू असता सदर गुन्हयाचे तपासकामी पथके तयार करून पंढरपूर शहरातील 36 ते 40 सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयात दोन आरोपी  प्रिया रवींद्र काळे (वय 30 वर्ष, रा राजापूर ता. मंगळवेढा जिल्हा सोलापूर) संदीप युवराज मोरे (वय 26 वर्ष, रा. अंबाबाई मंदिर गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन, विजापूर रोड सोलापूर) यांचेकडून सदर गुन्ह्यात चोरी केलेला 100% मुद्देमान हस्तगत करण्यात आलेला आहे.  

 गु.र. क्र 284/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी  मुकुंद संजय चव्हाण (रा. सुस्ते ता.पंढरपूर जिल्हा सोलापूर) यांचे दिनांक 03/05/2026 रोजी 12/30  वाजताचे सुमारास त्यांचा मावस भाऊ वैभव जाधव यांचे श्रीराम मंगल कार्यालय इसबावी पंढरपूर येथे लग्न समारंभात गर्दीचा फायदा घेऊन नवरी मुलीचे फिर्यादीचे आईकडे ठेवलेले बॅग मधील 20.789 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 5.920 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, 9.800 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोकर्स असे एकूण 36.499 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 5,40,000/- रुपये चालू भावाप्रमाणे अज्ञात चोरट्याने चोरी केले होते. 

सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पंढरपूर शहर व इतर गाव व शहरातील जवळपास 65 ते 70 सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून तसेच सी डी आर एस डी आर व मोबाईल टॉवर चे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यात आरोपी संदीप युवराज मोरे (वय 26 वर्ष, रा अंबाबाई मंदिर गरीबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन विजापूर रोड सोलापूर) यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरी केलेला 100% सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. 

गु.र. क्र 432/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी  स्वाती भारत डुकरे (रा. आंबी ता. राहुरी जिल्हा अहिल्यानगर) यांचे दिनांक 27/06/2026 रोजी 10/30 वा. चे सुमारास पंढरपूर बस स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 03 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र किंमत 45000/- रुपये चोरी केले होते, 

सदर तपासादरम्यान 24 तासाच्या आत पंढरपूर शहरातील 40 ते 45 सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून आरोपी  चांदणी हिरु भोसले (वय 20 वर्ष, रा माळवाडी, वडगाव गुप्ता, ता जिल्हा अहिल्यानगर) हीच्याकडून 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 

असे एकूण 67.499 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत, 9,30,000/- रुपये  किमतीचे, 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,  अपर पोलीस अधिक्षक  विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग  प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे  टी वाय मुजावर , DB पथक पोलीस उपनिरीक्षक  नितीन जगताप, श्रेपोसइ राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, पोह 398 सिरमा गोडसे, पो,ह 353/ उबाळे, पोह 1789 सचिन हेंबाडे, पोह 1307 पाटील, पोना/563/ साहिल तांबोळी, पोना/546 कृष्णा पकाले, पोशि 1216 शहाजी मंडले, पोशि 1304 नवले, पोकॉ 1513 बजरंग बिचुकले, पोकॉ 1240, हर्षद ठाकर, पो 335/लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोशि 1182 रतन जाधव, 1496/प्रकाश वाघमारे  यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या