देशात शांतता टिकवायची असेल तर.......
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/7/2026 :
*देशातही शांतता टिकावी. तिथं आंदोलन होवू नये. असं जर सरकारला वाटत असेल तर...... देशातील या कॉक्रोज जनता पार्टीला सरकारनं हलक्यात घेवू नये. त्यांच्या काही मागण्या मान्य कराव्यात. जेणेकरुन देशात शांतता टिकेल. तसं पाहिल्यास देशातील प्रत्येकच जीव महत्वाचा आहे व देशात कुणालाच वेळ नाही. प्रत्येकाचा वेळ अमूल्य आहे. जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसलेले तरुण. त्यांचाही वेळ अमूल्य आहे. तरीही वेळ बरबाद करुन बिचारे आंदोलनास बसले. का? तर त्यांना वाटणारे भ्रष्ट मंत्री. त्यांचा राजीनामा व ज्यांच्या परीवारातील मुलं नीट परीक्षेच्या माध्यमातून मरण पावले. त्यांना मुआवजा. हे दोन मुख्य मुद्दे. तसा मुआवजा देता येवू शकतो. तसा मंत्र्याचाही राजीनामा घेता येवू शकतो. परंतु का घ्यावा. असा विचार कदाचीत सरकारला येत असेल. कारण कॉक्रोज ज्याप्रमाणे चिल्लर प्राणी आहे. तसाच चिल्लर देशातील हा कॉक्रोज जनता पार्टीतील युवा आहे. असंही सरकारला वाटत असेल. ज्यातून तो युवा काहीच करणार नाही. असंही मत सरकारचं असू शकते. ज्यातून योग्य ती पावलं पडतांना दिसू लागली नाहीत. योग्य उपायही योजले जावू लागले नाहीत.*
कॉक्रोज जनता पार्टी नावानं आंदोलन करीत असलेले अभिजीत दिपके. जो एक विद्यार्थी आहे. ज्यात रंग आहे आंदोलन करण्याची. विद्यमान सरकारला तो विद्यार्थी असल्यानं टिकणार नाही, असं वाटलं. ज्याला सोनम वांगचूक यांनी आपल्या उपोषणानं समर्थन दिलं.
कॉक्रोज जनता पार्टी........ ही काहि शासकीय पार्टी नाही, ना ही ती राजकारणात मुरलेली पार्टी आहे. त्या पार्टीतील मुलं ही ना ही आपल्या स्वार्थासाठी जंतरमंतरवर आंदोलनाचं प्रदर्शन करीत आहेत. ना ही त्या लोकांना तेथील आंदोलनातून फायदा होणार. अतिरिक्त पैसै कमवता येणार. तसं पाहिल्यास कोणताच स्वार्थ नाही त्यांचा. तरीही ते मैदानावर आहेत. अन् अगदी शांतपणानं व मनानं विरोध करीत आहेत.
कॉक्रोज जनता पार्टीत तरुण रक्त आहे की जे एवढा अपमान होवूनही शांत चित्त राहू शकतील? ना त्यांच्या मागं प्रपंच आहे, ना काही जबाबदारी. वाटल्यास ते क्रांतीकारी भुमिका घेवूनही आंदोलन करु शकले असते. परंतु त्यांना माहीत आहे. माहीत आहे, त्यांना १८५७ चा उठाव. जो शस्रानंच केल्या गेला. ज्यात पराजय झाला. शिवाय क्रांतीकारी मार्गानंही कॉक्रोज जनता पार्टीतील काही कार्यकर्ते जावू शकले असते. परंतु त्यांना माहीत आहे की क्रांतिकारी मार्गानं आपण गेलो तर विद्यमान सरकारपुढं आपण टिकून राहू शकणार नाही. तसंच देशातील जनतेचं समर्थन मिळविता येणार नाही. तसा क्रांतीकारी मार्गही त्यांना माहीत आहे.
क्रांतीकारी मार्ग. होय, भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना त्याच कारणानं फाशी झाली होती. कारण त्यांनी ब्रिटिश सरकारचा विरोध म्हणून असेंब्लीत बॉंब टाकला होता. ज्यातून गुन्हा सिद्ध झाल्यानं फाशी. अन् त्यावेळेचा काळ हा हुकूमशाही पद्धतीचा होता. तेव्हा आपलं सरकार नव्हतं. सरकार होतं, ब्रिटीशांचं. ते म्हणतील ते. त्या पद्धतीनं होत होतं. आता तसं नाही. आता आपली सरकार आहे, असं लोकांना वाटतं. त्याचबरोबर कॉक्रोज जनता पार्टीतील लोकांनाही वाटतं. ते सरकार आपलं असल्यानं आपल्या मागण्या पुर्ण करतीलच, असंही वाटतं.
मागण्या....... मागण्या काही मोठ्या नाहीत. त्या तीव्रही नाहीत. नीटच्या पेपरफुटीमागे धर्मेश प्रधानची चूक असल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा. ही एक मागणी व दुसरी मागणी मुआवजाची. ज्या नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांना मुआवजा. ज्या मागण्या पुर्ण करताच येवू शकतात. जसं धर्मेश प्रधानचा राजीनामा घेवून त्या ठिकाणी नवीन मंत्री बसवला जावू शकतो. तसंच फुल नाही फुलाची पाकळी स्वरुपात नीटमध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या परीवारालाही मदत केली जावू शकते. ज्याप्रमाणे देशात अन्नधान्य मोफत देवून लोकांना मदत केली जात आहे तशी. ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देवून मदत केली जात आहे तशी. ज्याप्रमाणे निराधार नसलेल्या लोकांना निराधार समजून मदत केली जात आहे तशी.
लोकांना विद्यमान सरकार अन्नधान्य मोफत देतं. लाडक्या बहिणींना पैसे देतं. निराधारांना पैसे देतं. वयोवृद्धांना पैसे देतं. कलावंतांना पैसे देत. सरकार लोकांना पैसे वाटत असतं, आर्थिक मदत म्हणून. धान्यही वाटतं, एक मदत म्हणून. परंतु या गोष्टीतून ती मंडळी आळशी झाली आहेत. त्यांना काम करण्याची गरज नाही व ते कोणतेच काम करीत नाही. आता शेतीवर कामालाही मजूर मिळत नाही. ही महाराष्ट्रातील स्थिती आहे व अशाच प्रकारची काहीशी स्थिती ही देशाच्या इतर भागातीलही आहे. तसं पाहिल्यास देश आळशी झाला आहे व या देशातील जनतेला आता कोण काय करतं? कोण आत्महत्या करतं? या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. तसं पाहिल्यास त्यांना शिक्षणाशी व रोजगाराशी घेणंदेणं आहे. कारण आज जरी त्यांना शिक्षणाशी काही घेणदेणं नसलं तरी पुढील काळात त्यांचीही मुलं मोठी होतील. त्यांनाही उच्चशिक्षणाची गरज वाटेल व त्यांनाही त्यांची मुलं हुशार निघाल्यास डॉक्टर बनवाविशी वाटेल. त्यातच जेव्हा आजच्यासारखा पेपर फुटेल व त्यांच्या मुलांना आत्महत्या कराव्या लागतील ना. तेव्हा त्यांना आजच्या कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन कळेल की ते आंदोलन कशासाठी होतं?
कॉक्रोज जनता पार्टीच्या दोन्ही मागण्या पुर्ण करता येवू शकतात. परंतु आता अस्मितेचा प्रश्न उरला आहे, देश चालविणाऱ्या लोकांसमोर. ते आजही देशातील युवावर्गांना चिल्लर समजतात. जे आंदोलन करीत आहेत. विचार करीत असेल विद्यमान सरकार की हे का पोट्टे, आम्हाला शिकविणार. आम्ही राजकारणातील मुरले आटलेले लोकं. तसं पाहिल्यास या पार्टीचा जन्मच मुळात त्यांना झुरळ संबोधल्यावरुन झालाय. कोणत्यातरी राजनेत्यानं देशातील या तरुण रक्तांना झुरळ संबोधलं होतं. अन् ज्याप्रमाणे झुरळ जमीनीवर रांगतं. त्याला पायाखाली कोणीही कुस्करून जातात. तसेच आज विद्यमान सरकार या पार्टीतील युवावर्गांना समजत आहेत. त्यांचा शांतपणा पाहून सरकारला हेच दिसतंय. परंतु ज्याप्रमाणे एका कॉक्रोजला मारता येवू शकतं कुस्करून. परंतु अनेक असले तर....... तर मुकाबला करणं कठीण जातं. तीच स्थिती आज बावीस दिवसाच्या आंदोलनानंतर चित्र दिसत आहे. जी ती सुज्ञ मंडळी घरातून निघत आहेत व पार्टीला समर्थन देत आहेत. त्यातच सरकारनं हे आंदोलन दडपण्यासाठी कॉक्रोज जनता पार्टीच्या समर्थनार्थ काल सोनम वांगचूक यांना, त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची इच्छा नसूनही रुग्णालयात नेलं. ज्या रुग्णालयात खुद्द त्यांच्या पत्नीलाही भेटू दिलं जात नाही. ही अवस्था. याचाच अर्थ देश हा आता स्वतंत्र असल्यावरही स्वतंत्र वाटत नाही. कदाचित दिखाव्यापुरतीच स्वतंत्र्यता आहे. असा होतो.
कॉक्रोज जनता पार्टी तरीही चूप आहे. कारण त्यांना स्वातंत्र्याचा इतिहास माहीत आहे. देशातील लोकांना महात्मा गांधींनी एकत्र केलं, केवळ शांततेच्या मार्गानं. त्यांनी कित्येक जीवं जावू दिले, इंग्रजांच्या गोळीनं. परंतु क्रांती केली नाही. मग जालियनवाला बाग हत्याकांड असो वा सायमन गो बॅक. सगळ्या गोष्टी शांततेनंच केल्या. ज्यातून लोकं जुळले व जनता एकत्र एका झेंड्याखाली आली. हा इतिहास कॉक्रोज जनता पार्टीला माहीत आहे. परंतु त्यांना १९४२ चा चलेजावचाही उठाव माहीत आहे की ज्यावेळेस इंग्रज सरकार महात्मा गांधींच्या शांततामय मार्गाला घाबरत नव्हती व स्वातंत्र्य देत नव्हती. तेव्हा याच महात्मा गांधींनी नारा दिला होता. इंग्रजो, चलेजाव. भारत छोडो व दुसरा नारा होता करो या मरो. करो या मरोचा अर्थ असा होता की की आता यापुढे आपण शांततामय मार्गानं चालू नये. आता तुम्ही सर्वजण सक्षम आहात व सर्वजण एकत्र आलेले आहात. आता तुमची स्वतःची ताकद वाढलेली आहे व आता तुम्ही स्वतःच स्वतःचं कार्य करण्याफाठी सक्षम आहात. आता तुम्हाला माझं बोट धरुन चालायची गरज नाही. तेव्हा आजपासून तुम्हाला जे करायचं असेल ते करा. यातून मरण आलंच तर वीरमरण आलं आहे, असं समजा. कदाचीत तुम्ही स्वतःलाच स्वतःचे मोठे नेते समजा. कारण ब्रिटिश सरकार आम्हा मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकणार आहे.
महात्मा गांधींचा तो १९४२ चा चलेजावचा संदेश. ज्यातून लोकांना काय ते समजलं. त्यानंतर इंग्रजांनी त्यावेळेस सर्वच पुढाऱ्यांना अर्थात नेत्यांना तुरुंगात टाकलं. परंतु देशातील सामान्य जनता काही घाबरली नाही. ती घराघरातून बाहेर पडली. ज्यांनी पोलीस ठाणे जाळले. ज्यांनी टेलिफोनच्या तारा तोडल्या व क्रांती केली. ज्यातून पुढे इंग्रजांनाही कळलं की आता पुरे झालं, भारतावरचं राज्य. आता आपण यांना स्वातंत्र्य देवून टाकायला हवी. तद्नंतर स्वातंत्र्य मिळालं.
स्वातंत्र्य व स्वराज्य. हे दोन भिन्न शब्द. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं तर आदिलशाही, निजाणशाही नव्हे तर आपल्याच माणसावर आपलीच माणसं जी अत्याचार करीत होती. त्यांच्यापासून स्वराज्य मिळालं. ते शिवाजी महाराजांनी मिळवून दिलं. त्यासाठी शिवरायांनी असे सवंगडी निर्माण केले. ज्यांनी त्यांच्यासाठी प्राण न्योछावर केले. परंतु त्यांना काहीही होवू दिलं नाही. अन् स्वराज्य मिळालं. ज्यासाठी बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी, जीवा महाला, शिवा काशीद, असे कितीतरी वीर कामास आले.
हा भारत आहू व या भारताचा संबंधित आपल्या पुर्वजांपासूनच इतिहास आहे. ज्या ज्या व्यक्तीनं वा ध्यक्तीहमुसानं अत्याचार केला. त्या त्या लोकांचा अत्याचार संपविण्यासाठी देव कुणाला ना कुणाला जन्माला टाकतोच. जसं रामाला रावण संपविण्यासाठी जन्माला घातला. तसंच कंसापासून लोकांना सुखी करण्यासाठी क्रिष्ण जन्मास आला. देशमुख, देशपांडेच्या रुपानं राज्यावर होणारा अत्याचार दूर करण्यासाठी शिवराय, औरंगजेबांचा अत्याचार दूर करण्यासाठी ताराबाई, इंग्रजांचा अत्याचार दूर महात्मा गांधी आणि आता नेत्यांचा अत्याचार दूर करण्यासाठी अभिजीत असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
देशातील जनता काही खायला मागत नाही. ती जनता काही मोफत स्वरुपात लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये मागत नाही. देशातील जनता मागते रोजगार आणि सोबतच उच्चशिक्षण. शिक्षण हे निःशुल्क करावं ही लोकांची इच्छा. कुणालाही कोणत्याही स्वरुपाचे पेटर फुटायला नकोत. असंच वाटतं. कारण त्यातून लोकांच्या पाल्यांच्या मेहनतीचं नुकसान होतं. बिचारे रात्रंदिवस एक करुन अभ्यास करतात. अशावेळेस वेळेस पेपर फुटल्यास सारेच वांदे. कारण कुणी अपेक्षेनं आटल्या वडिलांची शेती विकायला लावलेली असते. कुणी त्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी शिकवणी लावत असतांना येणारा खर्च पाहून कर्ज काढलेले असते तर कुणी घर गहाण टाकलेले असते व त्यांनी पुर्ण अभ्यास करुन अपेक्षेनं परीक्षेची तयारी केलेली असते. अशावेळेस पेपर फुटलाच तर मग गैरसोय होणार नाही तर काय? याच गैरसोईनं आत्महत्या. परंतु या बाबी कोण समजून घेणार? लहानपणाचे एसीतच राहून मोठी झालेली नेत्यांची मुलं. ज्यांनी गरिबीच पाहिलेली नाही. ज्यांना गरिबी म्हणजे काय? ते कळलेलं नाही. त्यांना कसावकळेल नीटचा अभ्यास व नीटसाठी विकावं लागलेलं शेत वा घेतलेलं कर्ज. खरं तर काहीकाही नेत्यांच्या पदव्याही बोगसच आहेत. गतकाळातही असे काही नेते होवून गेले की त्यांना डॉक्टरेट मिळाले. कसे? ते काही कोणत्या महाविद्यालयात पी एच डी करायला गेले होते काय? इथं काही मंत्री असेही असतील की ज्यांना एबीसीडी समजत नसेल. परंतु ते मुख्य नेत्यांच्या जवळ असल्यानं सारंच बरोबर.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आज कॉक्रोज जनता पार्टीला आंदोलन करण्याची गरज नव्हतीच. ना ही त्यांनी आंदोलन केलं असतं. परंतु देशात लोकांची विद्यमान सरकारकडून होत असलेली पिळवणूक पाहून त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांनी पाहिलं की या देशात शेतकरी वर्गाला सुख नाही. त्यांच्या नेत्या विनाकारण देशातील श्रीमंतांना लीजवर देण्याचे निर्णय परस्पर घेतले जातात. त्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं. जे चिरडलं जातं. इथं महिलांचे विनाकारण कायदे पास करण्याचा घाट घातला जातो. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा घाट घातला जातो. एवढंच नाही तर या देशाला घडविणाऱ्या शिक्षकालाही टेट परिक्षेच्या रस्सीनं दावणीला बांधलं जातं. ना बेरोजगारांचा प्रश्न सोडवला जात. ना परीक्षा बरोबर घेतल्या जात. मात्र देशातील नेतेच मालामाल होतांना दिसत आहेत. जे एसीमध्ये राहतात व फक्त नि फक्त गोष्टी सांगतात.
विशेष म्हणजे आजही काही बिघडलेलं नाही. आजही मार्ग मोकळा आहे. कॉक्रोज जनता पार्टी निर्माण करणारा घटकही चूप बसू शकेल. गर त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर....... मुख्य मागणी आहे, धर्मेश प्रधानचा राजीनामा. जर अस्मितेच्या मग्रुरीनं तो जर त्यांना मिळाला नाही तर तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी ते भडकून उठतील व या देशाचा नेपाळ वा अफगाणिस्तान करुन टाकतील. तसं जर झालं नाही तर देशातच अंतर्गत गृहयुद्ध छिडकेल. ज्यातून हिटलरनं जशी आत्महत्या केली होती. तशीच आत्महत्या कदाचित देशातील नेत्यानाही करावी लागू शकते. तेव्हा हे आंदोलन शक्य तेवढ्या लवकर सामोपचारानं मिटवून टाकावं. जेणेकरुन देशातील शांततेला धक्का बसणार नाही. हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे
नागपूर ९३७३३५९४५०

0 टिप्पण्या