भक्त प्रल्हाद पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र नीरा नरसिंगपूर यांचे बुधवारी विंचूरकर वाडा येथे प्रस्थान

 भक्त प्रल्हाद पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र नीरा नरसिंगपूर यांचे बुधवारी विंचूरकर वाडा येथे प्रस्थान 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 18/7/2026 :

 भक्त प्रल्हाद पायी दिंडी सोहळ्या चे नृसिंह मंदिरापासून भक्त प्रल्हादांच्या पादुका पालखी मध्ये घेऊन मंगळवार दि.२१ रोजी विंचूरकर वाड्यमध्ये प्रस्थान सोहळा होत आहे.भक्त प्रल्हाद पायी दिंडी सोहळ्याचे हे 18 वे वर्ष आहे ..लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट  व वारकरी मंडळ संचलित हा उपक्रम सर्व भाविक भक्तांच्या वारकरी बंधूंच्या सहकार्याने पार पडत आहे.

बुधवार दिनांक दिनांक 22/ 7/2026  रोजी सकाळी सात वाजता पंढरपूर कडे प्रयाण होत आहे. त्या दिवसांचे चहापान व अल्पोपहार संगम चौकामध्ये होईल. तर अल्पोपहार जांभूळ बेट येथे बाबासाहेब यशवंत महाडिक संगम यांच्याकडे होईल. त्यानंतर दुपारचे भोजन विश्रांती कदम वस्ती महाळुंग येथे रेडे पाटील यांच्या वस्तीवर होईल. दुपारचे भोजन शहाजी शंकरराव ताटे-देशमुख यांचे होत आहे. चहापान हनुमान मंदिर श्रीपुर येथे वैभव तांबोळकर,नंदकुमार पाटील , सतीश डिंगरे यांच्या वतीने होत आहे .रात्रीचा मुक्काम विठ्ठल निवास ह. भ .प .देवराव विठ्ठल गमे पाटील माळखांबी यांच्याकडे होत आहे व रात्रीचे भोजन भागवताचार्य सुधाकर हरी दंडवते, आनंद  व वैभव मुकुंद सुरू व प्रशांत दंडवते यांच्या वतीने देण्यात येत आहे .दिंडीच्या तिसरे दिवशी गुरुवार दि. 23 /7 /26 रोजी सकाळचा चहापान  व अल्पोपहार मच्छिंद्र काळे , आशुतोष डोळे  व श्रीमती आशा अरगडे यांच्या वतीने करण्यात येत आहे .दुपारचे भोजन विश्रांती श्रीराम मंगल कार्यालय बोंडले येथे श्री रावसाहेब निकम यांच्या कार्यालयात होत आहे.आणि दुपारचे भोजन  लक्ष्मण केसकर व श्रीराम डिंगरे, सतीश डिंगरे व नरेश पाठक यांच्या वतीने देण्यात येत आहे.रात्रीचा मुक्काम  वसंतराव काळे प्रशाला, वाडी कुरवली येथे होत आहे .आणि रात्रीचे भोजन भारत  कुलकर्णी,  मुकुंद नरहर देवळे यांच्या वतीने देण्यात येत आहे. दिंडी सोहळ्याच्या चौथ्या दिवशी शुक्रवार दि. 24 /7/ 26 रोजी चहापान व अल्पोपहार वसंतराव काळे प्रशाला वाडीकरोली येथे भीमराव सरवदे, हनुमंत ज्योतिबा भोसले, अतुल भोसले यांच्या वतीने होईल .दुपारचे भोजन व  विश्रांती ग्रामपंचायत कार्यालय भंडी शेगाव येथील भैरवनाथ मंदिरामध्ये आहे भोजन प्रसाद  ज्ञानेश्वर अरगडे (मुख्य विश्वस्त लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट नरसिंहपूर ) यांच्या वतीने होईल. रात्रीचा मुक्काम माध्यमिक आश्रम शाळा वाखरी येथे होईल. व रात्रीचे भोजन  पंडित माणिकराव ताटे देशमुख,  प्रतापराव सिद्धेश्वर क्षीरसागर  यांच्या वतीने देण्यात येईल. आषाढी एकादशी  दिवशी  शनिवारी दिनांक 25/7/26 रोजी चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा,नामदेव पायरी दर्शन व भजन  होईल.. फराळ व विश्रांती माध्यमिक आश्रम शाळा वाखरी येथे होईल आणि त्यावेळचा फराळाचा प्रसाद ज्ञानदेव माणिकराव क्षीरसागर, मगनदास श्रीपती क्षीरसागर, पुष्कराज गणपत शिरसागर, श्रीमती रजुनंदा चमरे, यांच्या वतीने देण्यात येईल. दुपारनंतर  नीरा नरसिंगपूरकडे प्रयाण होईल ..रात्रीचा मुक्काम श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर निरा नरसिंगपूर येथे होईल आणि रात्रीचा फराळ प्रभाकर केशव जगताप यांच्यावतीने देण्यात येईल आणि रात्रीचे कीर्तन ह.भ.प. अंकुश रणखांबे महाराज यांचे होईल.  आषाढ द्वादशी रविवार दिनांक 26 रोजी सकाळी दहा वाजता पारण्याची कीर्तन सेवा ह .भ. प. अंकुश रणखांबे महाराज यांच्या वतीने होईल आणि महाप्रसाद श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट नीरा नरसिंगपूर यांच्या वतीने देण्यात येत आहे. तरी सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनी या सोहळ्यांमध्ये सहभागी व्हावे ही  संयोजकाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या