मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/7/2026 :
मोकळ्या व आनंदी मनाने देवाशी केलेला संवाद जसा मनाला आनंद देतो, तसे समोरच्या व्यक्तीशी केलेल्या संभाषणाने मनाला समाधान वाटले पाहिजे.
आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला आधार वाटणे, मनाला उभारी येणे किंवा उत्साही वाटणे असे जर होत असेल, तर ते देवाची प्रार्थना केल्यासारखेच असते.
कोणाशी रागावून बोलणे, टोचून बोलणे, भांडणे, चहाड्या करणे यांमधून ना स्वतःला आनंद होतो, ना ऐकणाऱ्या व्यक्तीला. असे बोलणे समोरच्याला दुःखी-कष्टी करते व आपली पण मानसिकता बदलते.
आजचा संकल्प
आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला आनंद नाही झाला तरी ती दुखावली जाणार नाही याची काळजी घेऊ व नेहमी सकारात्मक संभाषण करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
==================

0 टिप्पण्या