विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/7/2026 :
आपण मोठे झालो की आपल्यात थोडा अहंपणा येऊ लागतो. आपण स्वतःला हुशार समजू लागतो. आपल्याला कोणी काही शंका विचारली किंवा 'मला हे समजावून सांग' असे म्हणाले की, आपण अजून गर्वाने फुगतो.
ज्याची अडचण आहे, त्याला समजावून सांगितल्याने तो मुद्दा आपला पण पक्का होतो. काहींना एकदा सांगून समजत नाही, अशा वेळेस त्यांना समजेपर्यंत समजावून सांगण्याची सहनशीलता आपल्यात हवी.
मुलांनो, यामध्येच आपल्या मनाचा मोठेपणा असतो. अडलेल्या व्यक्तीला मदत करावी हा विचार असणे आणि प्रत्यक्ष न चिडता, शांतपणे मदत करणे, हा भाग वेगळा आहे. कृती करताना प्रत्यक्ष अनुभव येतो व कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो.
'एकमेका साहाय्य करू, अवघा धरू सुपंथ' हा विचार कृतीत आणू व आनंद मिळवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या