विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/7/2026 :
पावसाळा सुरू झाला की निसर्गात हिरवळ वाढते. पावसाने धुवून निघालेली झाडे, रस्ते व घरे स्वच्छ आणि छान दिसतात. उन्हाळ्यात आटलेल्या नद्या दुथडी भरून वाहू लागतात. थंडगार, आल्हाददायक हवा मनाला उल्हासित करते.
मात्र पाऊस वाढत राहिला की नद्यांना पूर येतो. रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप येते. घराबाहेर पडणे अवघड होते. अनेक वस्त्या, घरे पूरबाधित ठरतात. पूर ओसरला की संसर्गजन्य आजार सुरू होतात. लहान मुले व वयस्कर माणसांना त्याचा जास्त त्रास होतो.
मुलांनो, सध्या असे दूषित वातावरण आहे. पाणी नेहमी उकळून प्या. बाहेर जाताना घरातूनच पाण्याची बाटली न्या. बाहेरचे अन्न खाणे टाळा. घरात तयार केलेला, सकस व पौष्टिक आहार घ्या. या दिवसांत पचनशक्ती जरा नाजूक असते, त्यामुळे जेवताना काळजी घ्या.
आरोग्य जपा, तंदुरुस्त राहा.
सौ. स्नेहलता स. जगताप.
===================

0 टिप्पण्या